Bihar Election : बिहारच्या विधानसभा निवडणुकीत एनडीएला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. आतापर्यंतच्या सर्वाधिक विजय हा भाजप आणि जेडीयू आणि मित्रपक्षांच्या पदरात बिहारच्या जनतेनं टाकलाय. या विजयामध्ये बिहारच्या नितिश सरकारने निवडणुकीच्या तोंडावर सुरू केलेल्या महिला रोजगार योजनेचा मोठा वाटा असल्याची चर्चा देशाच्या राजकारणात सुरू आहे. या योजनेअंतर्गत नितिशकुमार सरकारने तब्बल 25 लाख महिलांच्या खात्यावर एकरकमी प्रत्येकी 10 हजार रुपये जमा केले होते. आणि हीच योजना टर्निंग पॉईंट ठरल्याचं बोललं जातय. यावरून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे.
निवडणुका स्वच्छ आणि पारदर्शी झाल्या पाहिजेत अशी प्रतिक्रिया बिहार निवडणुकीच्या निकालाबाबत शरद पवारांनी दिलीये. सरकारने दिलेल्या 10 हजारांचा फायदा झाला मात्र सरकारनं असं सरकारनं अधिकृतपणे पैसे वाटणं चिंताजनक आहे. याचा निवडणूक आयोगानं विचार करायला हवा असं शरद पवारांनी म्हटलंय.. पवारांच्या या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय.. विरोधकांनी आत्मपरीक्षण करावं.. पराभव मान्य कारावा असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिलाय.
बिहारमधील विजय हा भाजपचा विजय नसून निवडणूक आयोगाचा विजय असल्याचं म्हणत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रबारी रमेश चेन्निथला यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. तर निवडणूक आयोगाला दोष देण्यापेक्षा राहुल गांधींचं काय चुकतंय याचा विचार करा असं म्हणत भाजपने चेन्निथला यांच्यावर पलटवार केलाय.. बिहारचे निकाल धक्कादायक अजिबाद नाहीत. याच पद्धतीने निकाल लागावेत यासाठी भारताचा निवडणूक आयोग आणि भारतीय जनता पक्ष हातात हात घालून काम करताना दिसत होते. देशाची अवस्था गंभीर आणि चिंताजनक आहे. जणू महाभारतावर कौरवांचं अमर्याद राज्य सुरू झाले आहे व त्यास अंत नाही. बिहारच्या विजयाचा जल्लोष, ढोल नगारे दिल्लीच्या रस्त्यावर वाजवले जातीत. तो विजयी जल्लोष नसून भारतीय लोकशाहीची अंतिम यात्र सुरू झाल्याचा इशारा आहे. अर्थात मुडद्यांना जिवंत करण्याची ताकद भारतीय लोकशाहीत आणि संविधानात आहे. जनता पुन्हा उठेल, संघर्ष करेल. लोकशाहीचे हत्यारे अमर नाहीत. बिहारच्या निकालांनी धक्का बसावा असे काही नाही.
महाराष्ट्र विधानसभेच्या निकालापासून विरोधकांनी निवडणूक आयोगाला आणि भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय... बिहारमध्येही एनडीएला ऐतिहासिक यश मिळाल्यानंतर पुन्हा एकदा विरोधकांनी या निवडणूक प्रक्रीयेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केलेत. तर शरद पवारांनीही निवडणुकीच्या तोंडावर पैसे वाटपाचा सुरू होणाऱ्या योजनांवरून चिंता व्यक्त केलीय.. आता असा योजनांबाबत निवडणूक आयोग काही कठोर भूमिका घेतं का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More
LIVE|
NZ
205(75 ov)
|
VS |
WI
24/0(9 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
INA
(20 ov) 75/9
|
VS |
MAS
78/3(9 ov)
|
| Malaysia beat Indonesia by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 175/6
|
VS |
SA
74(12.3 ov)
|
| India beat South Africa by 101 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
MAS
(20 ov) 201/9
|
VS |
PHI
87/9(20 ov)
|
| Malaysia beat Philippines by 114 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.