पुणे : कोरोनाच्याबाबतीत महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री ठाकरे सरकार चांगले काम करत आहेत. विरोधकांकडून केवळ राजकारण करण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकार कोरोनाबाबतचे आकडे लपवत नाही. मात्र, भाजपची सत्ता असलेले गुजरात सरकार कोरोनाबाबतची आकडेवारी लपवत आहे, असा थेट आरोप राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी करत राज्य सरकारवर आरोप करणाऱ्या विरोधकांचा समाचार घेतलाय. महाराष्ट्रात कोरोना विषाणूबाबतची चाचणी संख्या वाढली म्हणून रुग्ण संख्या वाढतेय, असा दावा त्यांनी यावेळी केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रातील मोदी सरकाने मोठी घोषणा केली. ही केवळ घोषणा आहे. कारण घोषणा केलेले पॅकेज हे २० लाख कोटी रुपयांचे नसून प्रत्यक्षात १ लाख ६० हजार कोटी रुपयांचे आहे. राज्याचेही स्वतंत्र पॅकेज येईल, असं सांगत आमदार रोहित पवार यांनी केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारवर टीका करत ठाकरे सरकारचे कौतुक केले.



पुण्यात एमपीएससी स्टुडंट्स राईट्स आणि सृजन फाऊंडेशनच्यावतीने विद्यार्थ्यांना फूड पॅकेट दिले जात आहेत. त्या उपक्रमाला रोहित पवार यांनी भेट दिली. त्यावेळी ठाकरे सरकारचे कौतुक आणि केंद्रातील सरकावर जोरदार हल्लाबोल केला. सध्याच्या परिस्थितीत भाजपकडून होणाऱ्या टीकेकडे लक्ष द्यायची गरज नाही.  मजुरांना पहिल्याच टप्प्यात रेल्वेने त्यांच्या राज्यात सोडवायला पाहिजे होते, म्हणत त्यांनी केंद्रावर निशाणा साधला.



राज्यात ग्रीन तसेच ऑरेंज झोनमध्ये दुकाने सुरु होत आहेत. हॉटेल पार्सल सेवा सुरु आहे. केश कर्तनालाय दुकाने काही भागात सुरु होणे हा लॉकडाऊनचा एक्झीट प्लान असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. आरोग्य  व्यवस्था आणि आर्थिक व्यवस्था यापुढची संकटे ही आगामी काळात मोठी आव्हाने असतील. लस किंवा औषध कधी येईल माहिती नाही. मात्र, रोजगाराची समस्या मोठी असेल, अशी भीती रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केली.