भटक्या कुत्र्याला घाबरुन गाईने थेट दुसरा मजला गाठला, त्यानंतर...; पाहणारे पुणेकर हळहळले

पुण्यात एका गाईने चक्क दुसरा मजला गाठल्याने एकच खळबळ उडाली होती. अखेर अग्निशन दलाच्या मदतीने गायीची सुटका करण्यात आली.   

शिवराज यादव | Updated: May 16, 2025, 04:39 PM IST
भटक्या कुत्र्याला घाबरुन गाईने थेट दुसरा मजला गाठला, त्यानंतर...; पाहणारे पुणेकर हळहळले

भटक्या कुत्र्यांच्या भितीपोटी माणसांची उडणारी तारांबळ तुम्ही अनेकदा पाहिली असेल. पण अनेकदा याच भटक्या कुत्र्यांमुळे प्राण्यांचीही धावपळ होते. पुण्यात तर एका घाबरलेल्या गाईने चक्क इमारतीचा दुसरा मजला गाठला. यानंतर ती खाली येण्यास तयार नव्हती. अखेर अग्निशमन दलाच्या मदतीने अखेर गाईची सुटका करण्यात आली. सुदैवाने गाईला कोणतीही दुखापत झाली नसून, सुखरुप आहे. पुण्यातील रविवार पेठ भागात ही घटना घडली आहे. 

पुण्यातील रविवार पेठ भागात एक अनोखा प्रकार घडला. एका गायीने थेट दुसऱ्या मजल्यावर धाव घेतली, ज्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.  कुत्र्याच्या भीतीने घाबरलेल्या गायीने इमारतीच्या पायऱ्या चढत दुसऱ्या मजल्यावर आश्रय घेतला होता. गाय दुसऱ्या मजल्यावर गेल्यानंतर ती घाबरून खाली येत नव्हती. त्यामुळे नागरिकांनी अग्निशामक दलाला पाचारण केलं. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZEE 24 TAAS (@zee24taas)

अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि क्रेनच्या सहाय्याने रेस्क्यू ऑपरेशन राबवत गाईला सुखरूप खाली उतरवलं. या संपूर्ण प्रकारामुळे रविवार पेठ परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली होती. गाईला कोणतीही दुखापत झाली नसून ती सुखरूप आहे. पण तिला होणाऱ्या वेदना पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करत होते.