Crime News : मीरा-भाईंदरमध्ये अण्णा पॅलेस ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर गुप्त खोलीतून 13 बारबालांची सुटका करण्यात आली.

Crime News : मीरा भाईंदरमधील एका नगसेवकाच्या डान्सबारवर पोलिसांनी छापा टाकल्यावर भयान सत्य समोर आले. अण्णा पॅलेस ऑर्केस्ट्रा बारवर छापा टाकल्यानंतर आतला नजरा पाहाताच पोलीस हबकले. या घटनेमुळे डान्सबारचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या कारवाईदरम्यान 13 बारबालांची सुटका करण्यात आली. ज्यापैकी 6 मुली गुप्त खोलीत लपवून ठेवण्यात आल्या होत्या. नियमापेक्षा जास्त मुली बारचालकाने गुप्त खोलीत लपवल्या आहे, असा संशय पोलिसांना आली होती. त्यानंतर या बारवर छापा टाकण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार बारचालक या मुलींकडून आर्थिक फायदासाठी अश्लील कृत्य करुन घेत असल्याचे चौकशीदरम्यान समोर आलं आहे.
अण्णा पॅलेस’ नावाचा ऑर्केस्ट्रा बार हा भाईंदर पूर्व, गोडदेव फाटक रोड नवघर इथे आहे. पोलिसांना मिळालेल्या टीपनंतर इथे छापा टाकण्यात आला. पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीनंतर २३ एप्रिल रोजी मध्यरात्री पोलिसांनी ऑर्केस्ट्रा बारवर गेले. ज्यावेळी पोलिसांनी छापा मारला तेव्हा बारमध्ये स्टेजवर ४ महिला सिंगर्स तोकडे कपडे परिधान करून अश्लिल अंगविक्षेप करताना आढळून आले. पोलिसांना पाहताच बारमधील मद्यपी आणि स्टाफची धावाधाव सुरू झाली.
‘अण्णा पॅलेस’ ऑर्केस्ट्रा बार हा नगरसेवक गणेश शेट्टी यांच्या मालकीचा आहे. 13 बारबालकांची सुटका केल्यानंतर पोलिसांनी केवळ नोटीस देऊन त्यांना सोडून दिल्याचे वृत्त आहे. हा बार कायमच वादग्रस्त राहिला असून पालिकेने 2013 साली ऑर्केस्ट्रा बार असलेली इमारत अनधिकृत घोषित करण्यात आली होती.
गुरुवारी रात्री पोलिसांनी छाप टाकल्यानंतर बार व्यवस्थापनाने तातडीने कर्णकर्कश म्युझिक बंद केला. पण दुसरीकडे कॅव्हिटीमध्ये बारगर्लना लपवण्यात आले पण पोलिसांना संशय आला. त्यानंतर पोलिसांनी झाडाझडती सुरु केल्यानंतर बाथरूमच्या बाजूला भितींच्या कप्प्यात कॅव्हिटी असल्याचा संशय आला. एका बटणाने 8 बाय अडीच फूट अरुंद कॅव्हिटीमध्ये 6 मुली आणि 1 मुलगा दाटीवाटीने गुदमरल्या अवस्थेत आढळून आले आहेत. इलेकट्रॉनिक सॉकेटच्या आधारे उघडणाऱ्या या कॅव्हिटीतून पोलिसांनी त्या सर्वांची सुटका केली.