Thane Crime News: ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिस एका शाळेत विद्यार्थिनींना गुड टच, बॅड टचचे धडे द्यायला गेले पण तिथे गेल्यावर जे काही झालं ते ऐकून पोलिसही सून्न झाले आहेत. उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये पोलीस एका शाळेत विद्यार्थिनींना गुड टच, बॅड टचचे धडे द्यायला गेले, ते ऐकून एका चिमुकलीला आपला बाप आपल्यासोबत दुष्कर्म करत असल्याचं उमगलं अन् तिनं याबाबत शिक्षिकेला सांगताच या नराधम बापावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
उल्हासनगरात आरोपी बाप हा त्याच्या दोन मुलींसह वास्तव्याला असून त्याची पत्नी त्याच्यापासून विभक्त झाली आहे. यानंतर आपल्या मोठ्या मुलीच्या बाल अज्ञानाचा गैरफायदा घेत त्यानं तिला वासनेची शिकार केलं होतं. अशातच या मुलीच्या शाळेत उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलिसांकडून एका शाळेत गुड टच आणि बॅड टचची माहिती देण्यात आली.
पोलिस देत असलेली माहिती ऐकून या चिमुकलीला आपला बाप आपल्यासोबत दुष्कर्म करत असल्याचं उमगलं. याबाबत तिने शिक्षिकेला माहिती दिल्यानंतर शिक्षिकेनं पोलिसांच्या मदतीनं तिच्या आईला ही बाब सांगितली. याबाबत आईने मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून या नराधम बापाविरोधात पोक्सो आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नराधम बापाला अटक करण्यात आली आहे.
वडिलांची क्रुरकृत्ये समजताच पोलिसांनी यानंतर मुलीचा ताबा आईकडे देण्यात आला असून बाप आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या प्रकारामुळे उल्हासनगरमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
शेतात जळणाची लाकडं आणण्यासाठी गेलेल्या एका 20 वर्षीय विवाहितेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना जालना जिल्ह्यातल्या भोकरदन तालुक्यात घडलीये. 13 मार्चच्या दिवशी दुपारी 20 वर्षीय विवाहित महिला शेतात लाकडं आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी कठोरा बाजार येथील आरोपी सद्दामखा अजमेरखा पठाण, सादिकखा शफीकखा पठाण आणि फारुखा जीलाणी खा पठाण या तीन नराधमांनी महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर महिलेला धमकी दिल्यानं महिलेनं घडलेला प्रकार कुणाला सांगितला नाही. मात्र 20 मार्च रोजी रात्री उशीरा महिलेनं भोकरदन पोलिसात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी तीनही आरोपींच्या मुसक्या आवळत न्यायालयासमोर हजर केलं असता आरोपींना 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडीची शिक्षा सुनावण्यात आलीये.