जिथे ठाकरेंनी सभा घेतली तिथेच देवेंद्र फडणवीस यांचा मोठा धमाका! राज, उद्धव, आदित्य यांचा 3 मिनिट 22 सेकंदाचा असा व्हिडिओ दाखवला की...

आदित्य ठाकरे यांनी कालच्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नक्कल केली होती. त्यावर आज फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंचा समाचार घेतला. नक्कल करता करता काकांचा पक्ष संपला. तुम्हाला तर नक्कलही करता येत नसल्याचा हल्लाबोल फडणवीस यांनी आदित्य ठाकरेंवर केला. 

वनिता कांबळे | Updated: Jan 12, 2026, 10:21 PM IST
जिथे ठाकरेंनी सभा घेतली तिथेच देवेंद्र फडणवीस यांचा मोठा धमाका! राज, उद्धव, आदित्य यांचा 3 मिनिट 22 सेकंदाचा असा व्हिडिओ दाखवला की...

Devendra Fadnavis At Shivji Park :  शिवाजी पार्कवर ठाकरेंची तोफ धडाडली.  शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसे उमेदवारांसाठी ठाकरे बंधूंची संयुक्त प्रचारसभा शिवाजी पार्क येथे  पार पडली.  जिथे ठाकरेंनी सभा घेतली तिथेच त्याच शिवाजी पार्क मैदानावर जाहीर सभा घेत देवेंद्र फडणवीस यांनी मोठा धमाका केला.  देवेंद्र फडणवीस जाहीर सभेत एक व्हिडिओ दाखवला. 3 मिनिट 22 सेकंदाच्या या व्हिडिओत राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या काही क्लीप्स दाखवल्या.   

Add Zee News as a Preferred Source

सभेच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाव रे तो व्हिडीओ म्हणत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचे परस्परविरोधी विधाने दाखवली. युती होण्याआधी ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलायचे एकमेकांवर काय टीका करायचे हे या व्हिडिओत दाखवले. इतकचं नाही तर संजय राऊत आणि आदित्य ठाकरे राज ठाकरेंवर काय टीका करायचे हे देखील दाखवले. देवेंद्र फडणवीस यांनी या सभेत ठाकरे बंधूंवर जोरदार टीका केली.   

हाच तो व्हिडिओ..

महाराष्ट्रात तिसरे विमानतळ उभारणार - देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

महाराष्ट्रात तिसरे विमानतळ उभारणार. मुंबईत लंडनसारखी 3 विमानतळ उभारणार मुंबई छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाची क्षमता दीड पटीने वाढवणार. मुंबईत प्रत्येकाला हक्काचे घर देण्याचे काम आम्ही करणार. 30 वर्षात धारावीचे रिडेव्हलपेंट झाले नाही. मोदी सरकार आल्यावर फक्त 5 वर्षात धारावीचे रिडेव्हलपेंट करण्याचा निर्णय घेतला.  तुम्हाला अदानीला टेंडर द्यायचे होतं म्हणून रद्द केले होते का असा प्रश्न उपस्थित केला.  

राज ठाकरेंच्या व्हिडिओला प्रत्युत्तर

राज ठाकरेंनी अदानींचा उद्योग देशभर कसा पसरला याचा व्हिडिओ सभेत दाखवला. देवेंद्र फडणवीस यांनी देखील काही फोटो दाखवले.    काँग्रेसशासित राज्यातील मुख्यमंत्र्यांनसोबतचे अदानी यांचे फोटो दाखवले.   धारावीची जागा आम्ही डी आर पीला दिली.   सर्वात जास्त फायद्याचा ज्याने सौदा केला त्याला आम्ही टेंडर दिले.  

विकासावर बोलायला मर्द व्हावं लागते

विकासावर बोलायला मर्द व्हावं लागते.  पण, मी कुणाची मर्दानगी काढत नाही. माझ्यावर तसे संस्कार नाहीत. माझ्या आई वडिलांवर तुम्ही बोललात. मी त्या बापाचा पोरगा आहे जो राष्ट्रीय सेवक संघाचा सदस्य होता. मी त्या बापाचा पोरगा ज्याने कधी संपत्ती कमावली नाही.  माझे वडील स्वर्गातून पाहत असतील तेव्हा त्यांना वाटत असेल माझा मुलगा हिंदुत्व जपतोय.  आज माझा बाप स्वर्गातन बघत असेल तर त्यांना अभिमान वाटत असेल माझा मुलगा हिंदूत्व पुढे नेतो. पण तुमच्या पिताश्रींना काय वाटतं असेल तुम्ही रशीद मामू सोबत आहात ते बघून काय वाटत असेल त्यांना असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना लगावला.

वडापावच्या व्यतिरिक्त तुम्ही मराठी माणसासाठी स्वप्न पाहिलं नाही 

वडापावच्या व्यतिरिक्त तुम्ही मराठी माणसासाठी स्वप्न पाहिलं नाही. जो राज्यात गुंतवणूक करेल त्याचे आम्ही स्वागत करू. केवळ अदानी नाही तर टाटा ग्रुप, इन्फोसिस,आयसीआयसीआय, बिर्ला ग्रुप, भारती ग्रुप, सन फार्मा या सर्वांची रेव्हेन्यू वाढली. जर अर्थव्यवस्था विस्तारित होत असेल तर त्याचं स्वागत करावं की त्यांना धक्का मारला पाहिजे ? तुम्हाला चिंता नाही पण मला मुंबईकरांची चिंता आहे. त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी गुंतवणूक हवी आहे. मी उत्तरं द्यायला लागलो तर तोंड दाखवायला जागा राहणार नाही.   खुर्ची मिळवण्यासाठी भगवा फडकवायचा नाही तर बेईमानाचे राज्य घालवण्यासाठी महापौर बसवायचा आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More