यवतमाळ, नांदेडमध्ये मुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर...
प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागल्यानंतर ३१ जुलैची अंतिम तारीख ५ ऑगस्टपर्यंत वाढविल्याचे सरकारने जाहीर केले, मात्र यवतमाळ जिल्ह्यात याबाबतचे कुठलेही आदेश प्राप्त न झाल्याचं कारण पुढे करत जिल्हा बँकांनी पीक विम्याचे अर्ज घेण्याची प्रक्रिया बंद केली आहे.
यवतमाळ : प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी शेतकऱ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागल्यानंतर ३१ जुलैची अंतिम तारीख ५ ऑगस्टपर्यंत वाढविल्याचे सरकारने जाहीर केले, मात्र यवतमाळ जिल्ह्यात याबाबतचे कुठलेही आदेश प्राप्त न झाल्याचं कारण पुढे करत जिल्हा बँकांनी पीक विम्याचे अर्ज घेण्याची प्रक्रिया बंद केली आहे.
जिल्हा बँकेच्या ९४ शाखांसह १७५ कॉमन सर्व्हिस सेंटर बंद झाल्याने शेतकऱ्यांना आज विमा भरता आला नाही. त्यामुळं बँकात आलेल्या शेतकऱ्यांना परत जावे लागले. तर, नांदेडमध्येही शेतकरी पिका विमा भरण्यासाठी सकाळीच बॅंकेत पोहचले. पण सरकारचे तसे कुठलेच आदेश अजून प्राप्त झाले नाहीत, असं उत्तर बँकेत गेलेल्या शेतकऱ्यांना मिळालं. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत जवळ्पास चार लाख शेतकऱ्यांनी पिका विमा भरला आहे परंतु अजूनही जवळपास तितकेच शेतकरी बाकी आहेत. तेव्हा दिलेल्या मुदतवाढीत उर्वरीत शेतकऱ्यांचा विमा भरला जाईल का? असा प्रश्न निर्माण झालाय.
शेवटची तारीख : ५ ऑगस्ट २०१७
पिकविम्याची रक्कम भरण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ मिळणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. येत्या पाच ऑगस्टपर्यंत पीकविम्याचा अर्ज भरण्याची मुदत वाढवण्यात आलीय. ३१ जुलैपर्यंत पीकविमाचा अर्ज भरण्याची मुदत होती. मात्र अनेक शेतकरी पीकविम्यापासून वंचित राहिल्यानं मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर सरकारनं ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिलीय.
गेल्या वर्षी काही शेतकऱ्यांनी पाच - पाच वेळा विम्याची रक्कम घेतली, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. हे टाळण्यासाठी ऑनलाईन केवायसी करण्याचा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. याशिवाय पुढच्या वर्षी दोन ते तीन महिने आधीच केवायसी सुरु करण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.