अतिवृष्टीमुळे पिकांना फटका, मस्साजोगच्या सुचिता देशमुखला 'येथे' पाठवा आर्थिक मदत!

Suchita Deshmukh: लढ म्हणा या खास उपक्रमातून सुचिताच्या संघर्षाची कहाणी जाणून घेऊया.

प्रविण दाभोळकर | Updated: Oct 13, 2025, 08:29 PM IST
अतिवृष्टीमुळे पिकांना फटका, मस्साजोगच्या सुचिता देशमुखला 'येथे' पाठवा आर्थिक मदत!
सुचिता देशमुख

Suchita Deshmukh: सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे बीड जिल्ह्यातील  मस्साजोग गाव चर्चेत आलं. त्याच गावात अतिवृष्टीमुळे पिकांना फटका बसलाय.त्यामुळे मस्साजोग गावातून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या सुचिता देशमुखला आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय.शिक्षण पूर्ण होणार की नाही याची चिंता तिला सदावतेय. लढ म्हणा या खास उपक्रमातून सुचिताच्या संघर्षाची कहाणी जाणून घेऊया.

Add Zee News as a Preferred Source

पुण्यातल्या कर्वे शिक्षण संस्थेत एमएसडब्ल्यू करणारी सुचिता देशमुख हली आपला बराचवेळ लायब्ररीत घालवते. कारण  गेली दोन महिने तिच्या खासगी गर्ल होस्टलचं भाडं थकलंय.अतिवृष्टीमुळे सोयाबीन पाण्याखाली गेलंय.. त्यामुळे घरून शिक्षणासाठी पैसेच येणार नाहीत. त्यामुळे पुढील शिक्षण कसं पूर्ण करायचं याची चिंता तिला लागलीय. सुचिता देशमुखचं शिक्षण पुढे सुरु ठेवण्यासाठी तुम्हीही तिला थेट मदत करू शकता.

सुचिता जीवन देशमुख 
बँक खातं क्रमांक- 457104000127349
IFSC CODE - IBKL0001457
बँक - आयडीबीआय
शाखा - केज, बीड
G-PAY-9699722810

सुचिता ही मूळची बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावची कन्या...स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख हे देखील तिच्या नात्यातलेत.संतोष देशमुख यांनीच मोबाईल घेऊन दिल्याचं सुचिता सांगते. शेतकरी कन्या असलेल्या सुचिता देशमुखचं शिक्षण थांबू नये, यासाठी तुम्हीही तिला सढळ हातानं मदत करा..येवढचं झी 24 तासचं आवाहन. 

FAQ 

प्रश्न: सुचिता देशमुख कोण आहे आणि तिला कोणत्या समस्येचा सामना करावा लागत आहे?

उत्तर: सुचिता देशमुख ही बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील शेतकरी कन्या आहे, जी पुण्यातील कर्वे शिक्षण संस्थेत एमएसडब्ल्यूचे शिक्षण घेत आहे. अतिवृष्टीमुळे तिच्या गावातील सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त झाले, ज्यामुळे तिच्या कुटुंबाला आर्थिक अडचणी आल्या. यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून तिच्या खासगी गर्ल्स होस्टलचे भाडे थकले आहे, आणि तिचे शिक्षण पूर्ण होईल की नाही याची चिंता तिला सतावत आहे.

प्रश्न: सुचिता देशमुखच्या शिक्षणासाठी लोक कशी मदत करू शकतात?

उत्तर: सुचिताच्या शिक्षणासाठी थेट आर्थिक मदत करता येईल. तिच्या बँक खात्याची माहिती अशी आहे: बँक खाते क्रमांक - 457104000127349, IFSC कोड - IBKL0001457, बँक - आयडीबीआय, शाखा - केज, बीड. तसेच, G-Pay क्रमांक 9699722810 वरही मदत पाठवता येईल. झी २४ तासने लोकांना तिच्या शिक्षणासाठी उदार हाताने मदत करण्याचे आवाहन केले आहे.

प्रश्न: सुचिता देशमुख आणि मस्साजोग गाव यांचा संतोष देशमुख यांच्याशी काय संबंध आहे?

उत्तर: सुचिता ही मस्साजोग गावातील रहिवासी असून, स्वर्गीय सरपंच संतोष देशमुख यांच्याशी तिचा नातेसंबंध आहे. संतोष देशमुख यांनीच सुचिताला मोबाइल घेऊन दिला होता, असे ती सांगते. मस्साजोग गाव संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे आणि अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानामुळे सध्या चर्चेत आहे, ज्याचा परिणाम सुचिताच्या शिक्षणावरही झाला आहे.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More