Satara News : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. मात्र, महाराष्ट्रातच मराठी भाषेला डावललं जात असल्याचे दिसत आहे. बँक महाराष्ट्रात नावही बँक ऑफ महाराष्ट्र पण इथं येणाऱ्यांना हिंदीत बोलण्यात भाग पाडले जाते. साताका जिल्ह्यातील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये हा प्रकार सुरु आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नागरिकांमध्येही संतापाची लाट उसळली आहे.
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी येथे असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत हा प्रकार घडला आहे. येथे वृद्ध लोकांसोबत गैरवर्तन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, मराठीत न बोलता हिंदीतच संवाद साधण्यास भाग पाडले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. याबाबत राहुल शेडगे यांनी एका व्हिडिओद्वारे हा मुद्दा उपस्थित केला आहे. या व्हिडिओमध्ये ते म्हणतात,"पैसा महाराष्ट्राचा, जमीन महाराष्ट्राची, बँक महाराष्ट्राची आणि गुणगान हिंदीच..आता नाही चालणार!" असे सांगत या प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची मागणी होत आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे वागणे योग्य आहे का? याबाबत आता नागरिकांमध्येही संतापाची लाट उसळली आहे.
मुंबईच्या चारकोप मधील एअरटेल गॅलरीतील असाच प्रकार घडला होता. एअरटेल गॅलरी मधील कर्मचाऱ्यांची ग्राहकाला उद्धट उत्तर दिले. आम्हाला मराठी येत नाही आम्ही मराठीत बोलणार नाही तुम्हीच हिंदीत बोला. मराठी बोलणं गरजेचं नाही. म राठी ग्राहकाला दिलेल्या उद्धट उत्तरांचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या एअरटेल मधील कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अन्यथा मुंबईत एअरटेल ची गॅलरी दिसणार नाही
शिवसेना ठाकरे गटाचे राज्य संघटक अखिल चित्रे यांनी एअरटेल प्रशासनाला इशारा दिला.