Department of Stamps on Parth Pawar Land Deal: कोरेगाव जमीन प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. मुद्रांक शुल्क जमीन खरेदी विक्री करणा-या दोघांवर अमेडीया कंपनी आणि शीतल तेजवानी यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहे. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक राजेंद्र मुठे यांनी मुद्राक शुल्क पोलिसांत तक्रार करणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे या प्रकरणात आता पोलिसांचा प्रवेश होणार आहे.
पुण्यातील कोरेगाव पार्कमधील तब्बल 1840 कोटींचा जमीन खरेदी व्यवहार 'झी-२४ तास' उघडकीस आणताच संबंध राज्य सरकारची यंत्रणेला धक्के नव्हे; तर जबरदस्त हदरेच बसले आहेत. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी मुद्रांक शुल्क विभागही मैदानात उतरला आहे. व्यवहारातील जागेची नोंदणी (रजिस्ट्रेशन), मुद्रांक शुल्क आणि त्याची प्रक्रिया तपासण्यासाठी राज्य सरकारने खास महसूल खात्यातील धडाकेबाज अधिकारी आणि राज्याचे' जॉइंट आयजीआर' अर्थात, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक राजेंद्र मुठे यांच्या अध्यक्षतेखाली आणखी एक समिती नेमली आहे. या समितीच 5 अधिकाऱ्यांचा समावेश असून, पहिल्या दोन तासांच्या चौकशीत मुठे यांनी उपनिबंधक रवींद्र तारु यांचं निलंबन केलं आहे. त्यासोबत आणखी काही कागदपत्रेही मुठे आणि त्यांची समिती तपासत आहेत.
कोरेगाव पार्क, पुणे येथील जमीन खरेदी-विक्री व्यवहारामध्ये मोठ्या प्रमाणावर मुद्रांक शुल्क चुकविल्याबाबतची बातमी दि.06.11.2025 रोजी झी 24 तास यामध्ये प्रसिध्द झाली आहे.
सदर प्रकरणी चौकशी करण्यासाठी श्री. राजेंद्र मुठे, सह नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक अधिक्षक (मुख्यालय), म.रा., पुणे यांचे अध्यक्षतेखाली पुढीलप्रमाणे समिती नेमण्यात येत आहे.
1. श्री. उदयराज चव्हाण, नोंदणी उपमहानिरीक्षक (मुख्यालय), म.रा., पुणे
2. श्री. धर्मदेव माईनकर, नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक, पुणे विभाग, पुणे
3. श्री. संतोष हिंगाणे, सह जिल्हा निबंधक वर्ग 1, पुणे शहर
4. श्रीम. अनुजा कुलकर्णी, सहाय्यक नोंदणी महानिरीक्षक तथा कार्यासन अधिकारी क्र.4, नोंदणी महानिरीक्षक कार्यालय, पुणे
5. श्री. संजय पाटील, अति. कार्य. सहाय्यक नोंदणी महानिरीक्षक तथा कार्यासन अधिकारी क्र. 12, नोंदणी महानिरीक्षक कार्यालय, पुणे
उक्त समितीने या प्रकरणी सखोल चौकशी करुन सविस्तर अभिप्रायासह आपला अहवाल 7 दिवसांत सादर करावा.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(13.3 ov) 62
|
VS |
MAS
67/2(5.4 ov)
|
| Malaysia beat Thailand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.