Sharad Pawar Birthday : शरद पवारांनी दिल्लीत आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला अजितदादांनी हजेरी लावल्यानं राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची चर्चा सुरु झालीये. शरद पवार आणि अजित पवार या काकापुतण्यांच्या नात्यातील कटुता संपल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळं आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी चर्चा सुरु झालीय. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेनं शिवसेना सावध झालीये.
शरद पवारांपासून फारकत घेतल्यानंतर अजितदादांनी शरद पवारांच्या स्नेहभोजनाला लावलेली हजेरी चर्चेचा विषय झाली. या स्नेहभोजनानं दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाची चर्चा सुरु झालीय. अजित पवार यांच्याकडं राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह आहे. लोकसभा आणि विधानसभेला काका पुतणे एकमेकांविरोधात लढले. विधानसभेच्या निकालानंतर मात्र काका-पुतण्यांमध्ये फार वैरभाव राहिलेला नाही.
लग्नसमारंभ आणि इतर कौटुंबीक सोहळ्यांना काका-पुतणे एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. आता तर नागपुरात अधिवेशन सुरु असताना दिल्लीतल्या शरद पवारांनी आयोजित स्नेहभोजनाला अजितदादांनी हजेरी लावली. हे कमी की काय अजितदादांच्या कारमध्ये बसून रोहित पवार या मेजवानीला आले. काकांच्या भेटीला दोन काकापुतणे एकत्र आले म्हटल्यावर महाराष्ट्रात एकत्रिकरणाच्या चर्चांना उधाण आलं. जयंत पाटलांना काका-पुतण्याच्या एकत्र येण्यात फार काही वावगं वाटलं नाही.
मात्र, दोन राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याबाबत काँग्रेसनं स्वागत केलंय. पण हे स्वागत हातचं राखून केल्याचं नाना पटोलेंच्या वक्तव्यावरुन दिसत होतं.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास महायुतीचीच ताकद वाढणार आहे. पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्रिकरणाच्या चर्चेनं शिवसेना थोडीशी सावध झालीय. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षांत तणाव वाढला होता. त्या पार्श्वभूमीवर पवार काका-पुतण्यांची भेट राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी तर नाही ना अशी चर्चा सुरु झालीय. साहजिकच शिवसेनेच्या नेते या नव्या समीकरणाबाबत फारसे स्वागतोत्सुक दिसले नाहीत.
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र निवडणूक लढणार आहेत... पुण्यातही ठाकरेंची युती असणार आहे. त्या युतीत शरद पवारांचं स्थान सांगता येणार नाही. अजित पवारांसमोरही भाजपचं आव्हान आहेच... दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या तर पुणे पिंपरी चिंचवडमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरही काका पुतणे एकत्र येत असावेत... पण शरद पवारांच्या डोक्यात काय चाललंय याचा कुणालाही थांगपत्ता लागत नाही.
आताचाही ही भेट एकीकरणाची नांदी आहे हे कुणीही छातीठोकपणं सांगू शकणार नाही. या भेटीमागचा उद्देश काय हे समजण्यासाठी थोडा वेळ जाऊ द्यावा असं राजकीय अभ्यासक सांगू लागलेत.
सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.