Ajit Pawar Congratulates Zee 24 Taas on Koregaon Land Deal Case: पार्थ पवारांच्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाची आपल्याला कल्पना नव्हती असा दावा करत अजित पवारांनी यु-टर्न घेतला आहे. तसंच आपण आज संध्याकाळी या प्रकरणावर सविस्तर बोलणार असल्याची माहिती दिली आहे. तसंच आपलं पार्थ पवार किंवा इतर कोणाशीही बोलणं झालेलं नाही असंही म्हटलं आहे.
"माझा या गोष्टीशी दुरान्वये संबंध नाही हे मी कालच मराठीत सांगितलं आहे. आज सकाळापासून आमच्या आढावा बैठका आहेत ज्या 6 ते 7 वाजेपर्यंत सुरु असतील. त्यानंतर मी सांगणार आहे. इतर सर्व गोष्टी नियमाप्रमाणे करण्यास सांगितल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत. चौकशी होत असून त्यातून सत्य बाहेर येईल. सत्य समोर आल्यानंतर कारवाईसंदर्भात निर्णय घेतला जाईल," असं अजित पवारांनी झी 24 तासशी संवाद साधताना सांगितलं.
तुम्हाला याची कल्पना होती का? असं विचारलं असता अजित पवारांनी नकार दिला. "नाही, अजिबात नाही. मी नेहमी माझ्या लोकांना कोणतीही गोष्ट करताना कायद्याच्या, नियमाच्या, संविधानाच्या चौकटीत राहूनच करावी असं सांगतो". तुम्ही हे प्रकरण काढलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान पार्थ पवारांशी खासगीत कोणतंही बोलणं झालं नसल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्याने त्यात मी व्यापलो आहे असं कारण त्यांनी दिलं.
"तीन ते चार महिन्यांपूर्वी अशा पद्धतीचं काहीतरी सुरु असल्याचं माझ्या कानावर आलं होतं. तेव्हा मी असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असं सांगितलं होतं. कोणत्याही चुकीच्या गोष्टी कोणीही करु नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिल्या होत्या. त्यानंतर परत काय झालं मला माहिती नाही. आता वेगवेगळ्या जमिनीबद्दल बरंच काही सांगितलं जातं. त्याची इत्यंभूत माहिती घेणार आहे की कोणती कागदपत्रं आहेत कोणती नाही, कोणी परवानगी दिली, कोणी नाही," असं अजित पवारांनी सांगितलं होतं.
पुढे ते म्हणाले की, "मी आजपर्यंत मी जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांसंदर्भात फायदा होण्यासाठी एकाही अधिकाऱ्याला फोन केलेला नाही किंवा सांगितलेलं नाही. उलट मी यानिमित्ताने अधिकारी, कर्मचाऱ्यांना जर माझ्या नावाचा वापर करुन कोणी चुकीचं करत असेल किंवा नियमात न बसणारं करत असेल तर माझा पाठिंबा नसेल असं सांगत आहे. मी कायद्याच्या, नियमाच्या चौकटीत राहून काम कऱणारा कार्यकर्ता आहे".
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(13.3 ov) 62
|
VS |
MAS
67/2(5.4 ov)
|
| Malaysia beat Thailand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.