Ajit Pawar on Parth Pawar: पार्थ पवार यांच्या जमीन गैरव्यवहारावरुन राज्यात खळबळ उडाली असताना अजित पवारांनी अखेर मौन सोडून त्यावर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी आपल्याला अशा पद्धतीचं काहीतरी सुरु असल्याचं समजलं होतं असा गौप्यस्फोट केला आहे. "जे काही आता सुरु आहे त्याबद्दलची पूर्ण माहिती मला नाही. माझ्या त्या गोष्टीशी संबंध नाही. मला 35 वर्ष महाराष्ट्रातील जनता ओळखते. मी संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलं आहे," असं अजित पवारांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. तसंच मी कायद्याने चालणारा माणूस आहे सांगत आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत.
"तीन ते चार महिन्यांपूर्वी अशा पद्धतीचं काहीतरी सुरु असल्याचं माझ्या कानावर आलं होतं. तेव्हा मी असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असं सांगितलं होतं. कोणत्याही चुकीच्या गोष्टी कोणीही करु नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिल्या होत्या. त्यानंतर परत काय झालं मला माहिती नाही. आता वेगवेगळ्या जमिनीबद्दल बरंच काही सांगितलं जातं. त्याची इत्यंभूत माहिती घेणार आहे की कोणती कागदपत्रं आहेत कोणती नाही, कोणी परवानगी दिली, कोणी नाही," असंही अजित पवारांनी सांगितलं.
पुढे ते म्हणाले की, "मी आजपर्यंत मी जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांसंदर्भात फायदा होण्यासाठी एकाही अधिकाऱ्याला फोन केलेला नाही किंवा सांगितलेलं नाही. उलट मी यानिमित्ताने अधिकारी, कर्मचाऱ्यांना जर माझ्या नावाचा वापर करुन कोणी चुकीचं करत असेल किंवा नियमात न बसणारं करत असेल तर माझा पाठिंबा नसेल असं सांगत आहे. मी कायद्याच्या, नियमाच्या चौकटीत राहून काम कऱणारा कार्यकर्ता आहे".
"मुख्यमंत्र्यांनी जरुर चौकशी करावी. त्यांचा तो अधिकार आहे. जर उद्या कोणत्याही बाबतीत कोणी तक्रार केली तर चौकशी करुन त्याची शहानिशा करणं, सत्यता पडताळणं आणि काय नक्की घडलं आहे हे पाहणं हे सरकारचं कामच आहे. मी दिवसभर येथे असल्याने त्याची माहिती घेतली नाही. मी माहिती घेऊन उद्या संध्याकाळी भेटेन. काय झालं, कसं झालं. कागदपत्रं कायदेशीर आहेत का? नियमात बसतात का? सगळ्यांची माहिती घेईन वस्तुस्थिती समोर मांडेन," असं अजित पवार म्हणाले आहेत.
"मी कानावर आल्यानंतर चुकीच्या गोष्टी करु नका सांगितलं होतं. पण स्टॅम्प ड्युटी आणि इतर गोष्टींची शहानिशा करतो. अर्थमंत्री म्हणून काम करत असताना कोणत्याही व्यवहारात, टॅक्सच्या, सगळ्याच्या बाबतीत नियमानेच वागलं पाहिजे. सगळ्या गोष्टी नियमाप्रमाणेच झालंच पाहिजे. कोणीही नियमाच्या बाहेर जाऊन काम करता कामा नये याच मताचा मी आहे," अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.
पत्ता तुमच्या घऱचा आहे असं विचारलं असता अजित पवारांनी सांगितलं की, "माझ्या नाही तर तो बंगला पार्थ अजित पवारांच्या नावे आहे. तो पत्ता त्याचा आहे".
"मी सर्व माहिती घेऊनच बोलणार आहे. मी कधीही चुकीच्या कामाचं समर्थन केलेलं नाही. जर चूक झाली तर मी कबूल करतो. पण यात माझा दुरान्वये संबंध नाही. मी कोणाशी चर्चाही केलेली नाही. जेव्हा मुलं सज्ञान होतात तेव्हा त्यांचे व्यवसाय करतात. पण मी कोणत्याही अधिकाऱ्याला किंवा इतर कोणाला मदत करा सांगितलेलं नाही. मी संविधानाला मानणारा, कायद्याने चालणारा आणि इतरांनीही कायद्याने चालावं यासाठी कटाक्षाने प्रयत्न करणारा, कायद्याच्या चौकटी समजावून सांगणारा कार्यकर्ता आहे," असं अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.
शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे.
...Read More|
SIN
(19.3 ov) 110
|
VS |
MAS
111/4(11.4 ov)
|
| Malaysia beat Singapore by 6 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(20 ov) 153/7
|
VS |
PHI
156/9(19.4 ov)
|
| Philippines beat Thailand by 1 wicket | ||
| Full Scorecard → | ||
|
THA
(13.3 ov) 62
|
VS |
MAS
67/2(5.4 ov)
|
| Malaysia beat Thailand by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.