Dhananjay Munde First Comment About Resignation: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारला असून राज्यपालांकडे पाठवल्याची घोषणा आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचं कामकाज सुरु होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना केली. मागील अनेक आठवड्यांपासून बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन धनंजय मुडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. अखेर दोन महिन्यानंतर धनंजय मुंडेंनी या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडबरोबर जवळीक असल्याच्या सातत्याच्या आरोपीच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिल्याची चर्चा असतानाच मुंडेंनी हा राजीनामा वेगळ्याच कारणासाठी दिल्याचं स्वत: सांगितलं आहे. धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर पहिली प्रतिक्रिया नोंदवताना संतोष देशमुखांच्या व्हायरल व्हिडीओ आणि फोटोंचा उल्लेख केला आहे.
संतोष देशमुख यांना मस्साजोगमध्ये वाल्मिक कराडच्या सहकाऱ्यांकडून कशाप्रकारे अमानुषपणे मारहाण झाली यांचा धक्कादायक तपशील आरोपपत्रामधून समोर आला. या आरोपपत्रासोबत जोडण्यात आलेले मारहाणीचे धक्कादायक फोटो व्हायरल झाल्यानंतर राज्यभरामध्ये संताप व्यक्त केला जात आहे. अशातच मध्यरात्री अजित पवारांच्या 'देवगिरी' बंगल्यावर स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चर्चेसाठी पोहोचले. अजित पवारांबरोबर स्वत: धनंजय मुंडे आणि सुनिल तटकरे या ठिकाणी उपस्थित होते. चारही मंत्र्यांनी दीड तास चर्चा केल्यानंतर धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय घेण्यात आला. त्याप्रमाणे आज सकाळी धनंजय मुडेंनी फडणवीसांकडे राजीनामा सोपवला. मात्र आता हा राजीनामा आपण वेगळ्याच कारणासाठी दिल्याचं मुंडेंनी ट्वीट करुन म्हटलं आहे.
"बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले," असं धनंजय मुंडेंनी राजीनाम्यानंतर पहिली प्रतिक्रिया नोंदवताना म्हटलं आहे.
नक्की वाचा >> 'त्यांनी नैतिकतेवर...'; धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजित पवारांची अवघ्या 5 शब्दांत प्रतिक्रिया
"या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा माननिय मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे," असं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झाले.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसेच,…
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) March 4, 2025

या ट्विटवरुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त करत धनंजय मुंडेंवर निशाणा साधला आहे. "धनंजय मुंढे यांचं ट्विट केलं संतोष निर्घुण हत्या पाहून मन व्यथित झालं. यांना मन आहे का? वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा देत आहे. मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे. त्यांची तब्येत ठीक नाही असं म्हणतात काल विधिमंडळात फेरफटका मारायला आला होता का?" असा सवाल दामनिया यांनी विचारला आहे. "त्यांना लाज नाही. त्यांना चॅलेंज आहे. त्याची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार आहे. संतोष देशमुख यांना आदरांजली बीडला जाऊन वाहणार आहे," असं दमानिया यांनी म्हटलंय.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
CSK
(20 ov) 192/5
|
VS |
KKR
160/7(20 ov)
|
| Chennai Super Kings beat Kolkata Knight Riders by 32 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SRH
(20 ov) 216/6
|
VS |
RR
159(19 ov)
|
| Sunrisers Hyderabad beat Rajasthan Royals by 57 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 240/4
|
VS |
MI
222/5(20 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Mumbai Indians by 18 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.