Dhananjay Munde Resig Ajit Pawar First Comment: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा स्वीकारल्याची घोषणा केली. विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी अजित पवारांच्या पक्षातील मंत्र्याचा राजीनामा घेण्याची नामुष्की फडणवीस यांच्यावर ओढावली आहे. बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात क्रूरपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेला वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असून हे प्रकरण समोर आल्यानंतर आणि 31 डिसेंबर रोजी वाल्मिक कराडला अटक झाल्यापासूनच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. अखेर सोमवारी संतोष देशमुखांना अमानुषपणे मारहाण केल्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर संतापाची लाट असतानाच फडणवीस यांनी धनंजय मुंडेंना राजीनामा देण्याचे आदेश दिले. या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्याची माहिती समोर आल्यानंतर विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाच्या कामाकाजासाठी पोहोचलेल्या अजित पवारांना पत्रकारांनी घेराव घातला. अजित पवारांचं या राजीनाम्यावर काय म्हणणं आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. मात्र नेहमीप्रमाणे पत्रकारांशी संवाद साधतात त्या पोडियमजवळ न थांबता अजित पवारांनी थेट विधानसभेच्या इमारतीत प्रवेश करण्यात सुरुवात केली. त्यावेळी पत्रकारांनी त्यांच्याभोवती गराडा घालत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
अजित पवारांनी अखेर पत्रकारांना पडलेल्या चेहऱ्याने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर पहिली प्रतिक्रिया दिली. "त्यांनी नैतिकतेवर राजीनामा दिलेला आहे," असं अजित पवार म्हणाले.
सोमवारी सायंकाळी संतोष देशमुखांना मारहाण झाल्याचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर रात्री उशीरा अजित पवारांच्या 'देवगिरी' बंगल्यावर झालेल्या बैठकीत फडणवीसांनी धनंजय मुंडेंना स्पष्ट शब्दांमध्ये 'राजीनामा द्या' असं सांगितलं. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन सातत्याने धनंजय मुंडे आणि राज्य सरकारवर टीका होत होती. धनंजय मुंडेंनी या प्रकरणातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडला पाठबळ दिलं. वाल्मिकच्या इशाऱ्यानेच हे हत्याकांड झाल्याची माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील अनेक पुरावे समोर आल्यानंतर धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात होती. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासंदर्भात 'देवगिरी' बंगल्यावर रात्री साडेबारा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: पोहचले. त्यांनी या ठिकाणी अजित पवार, धनंजय मुंडे आणि सुनिल तटकरे उपस्थित होते. या चारही नेत्यांची जवळपास दीड तास चर्चा झाल्यानंतर मुंडेंचा राजीनामा घेण्यावर एकमत झालं.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 41 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.