Dhananjay Munde Resigned: बीडमधील मस्साजोगचे संरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी वाल्मिक कराडशी असलेल्या जवळच्या संबंधांमुळे मंत्री धनंजय मुंडेंना अखेर राजीनामा द्यावा लागला आहे. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या या हत्याकांडासंदर्भातील धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी कठोर भूमिका घेत धनंजय मुंडेंना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या 'देवगिरी' बंगल्यावरच राजीनामा द्या, असे आदेश दिले. त्यानंतर आज धनंजय मुंडेंनी त्यांच्या स्वकीय सचिवांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. मुंडेंचा राजीनामा स्वीकारल्यासंदर्भातील माहिती स्वत: मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली आहे.
"धनंजय मुंडेंनी राजीनामा माझ्याकडे दिला असून मी तो स्वीकारला आहे. हा राजीनामा मी पुढे राज्यपालांकडे पाठवला आहे," अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी दिली. मुख्यमंत्री फडणवीस हे मुंडेंच्या राजीनाम्यासाठी आधीपासून आग्रही होते. मध्यरात्री अजित पवारांच्या बंगल्यावरील बैठकीमध्ये फडणवीसांनी धनंजय मुंडेंना राजीनामा आजच द्या असे आदेश दिले होते. या बैठकीमध्ये अजित पवारांबरोबर सुनिल तटकरेही उपस्थित होते.
धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला असला तरी संतोष देशमुखांच्या हत्येच्या फोटो आणि व्हिडीओंवरुन आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस गाजणार असल्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
> बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून राजकीय वाटचाल सुरु केली.
> 2010 मध्ये भाजपाकडून विधानपरिषदेवर संधी मिळाली.
> 2013 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
> राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा विधान परिषदेवर संधी देण्यात आली.
> 2014 विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली.
> महाविकास आघाडी सरकारमध्ये 2019 मध्ये सामाजिक न्याय म्हणून न्याय विभागाचे मंत्री म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली.
> 2024 मध्ये कृषीमंत्री म्हणून संधी मिळाली.
> पुन्हा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघातून एक लाख 40 हजार मतांनी विजयी ठरले.
> महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात अन्न व नागरी पुरवठा मंत्री म्हणून समावेश करण्यात आला.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More
LIVE|
NEP
184/7(20 ov)
|
VS |
ENG
179/6(19.5 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
AFG
(20 ov) 182/6
|
VS |
NZ
183/5(17.5 ov)
|
| New Zealand beat Afghanistan by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
IND
(20 ov) 161/9
|
VS |
USA
132/8(20 ov)
|
| India beat USA by 29 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
WI
(20 ov) 182/5
|
VS |
SCO
147(18.5 ov)
|
| West Indies beat Scotland by 35 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.