Dharashiv Maharashtra Crime News Today: महाराष्ट्रातील महिला सुरक्षेचा प्रश्न चर्चेत असतानाच राज्याला हादरवून टाकणारा एक विचित्र प्रकार धाराशिवमधील तुळजापूरमध्ये घडला आहे. येथे सततच्या छेडछाडीला कंटाळून चक्क एका पोलीस हवालदाराच्या मुलीने स्वत:ला संपवलं आहे. पोलीस कॉन्स्टेबलच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांच्या मुलीची ही अवस्था असेल तर सर्वसामान्यांचं काय असा सवाल उपस्थित केला जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करणाऱ्या मुलीचं नाव सारिका शिकारे असं आहे. सारिकाने तुळजापूर शहरामधील पोलीस क्वॉटर्स एस.टी. कॉलनी येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सारिका केवळ 15 वर्षांची होती.
"माझ्यावर प्रेम कर, लग्न कर नाही तर सोशल मिडीयावर तुझी बदनामी करेल," अशी धमकी तिला ओंकार कांबळेने दिली होती. वारंवार बदमानीची धमकी देऊन ओंकारकडून धमकावलं जात असल्याने घाबरलेल्या सारिकाने स्वत:ला संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. आरोपी ओंकार कांबळेने सारिकाला बंदुकीने गोळ्या घालून तुला ठार करेन अशी धमकीही दिली होती.
नक्की वाचा >> Sonam Raghuvanshi पेक्षाही निर्दयी सांगलीची राधिका! वटपौर्णिमेलाच पतीला संपवलं; नवरा झोपेत असताना...
या प्रकरणी सारिकाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी ओंकार कांबळेबरोबरच नगिना शशिंकात पांडागळेविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपी ओंकार कांबळेचा एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये आरोपी ओंकार बंदूक घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्याने आरोपी ओंकार कांबळेवर यापूर्वीही अशाच प्रकारे शस्र हातात घेऊन दहशत निर्माण करण्याचा गुन्हा दाखल असल्याचं समोर आलं आहे.
पोलीस दलातील व्यक्तीसंदर्भातील हा मागील दोन दिवसातील दुसरा प्रकार आहे. बुधवारीच पुणे ग्रामीण पोलीस दलात एक खळबळजनक घटना समोर आली. पुणे ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी पोलीस हवालदार विष्णू केमदारणे मंगळवारी सकाळीपासून इंदापूर पोलिस ठाण्याच्या शासकीय वसाहतीतून बेपत्ता झाल्याचा खुलासा झाला आहे. केमदारणे यांनी लिहिलेली एक चिठ्ठी समोर आली असून या चिठ्ठीतून त्यांनी इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्यासह अन्य दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
मागील दोन महिन्यांपासून पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी पोलीस हवालदार रासकर आणि पोलीस कॉन्स्टेबल सूर्यवंशी यांच्या सांगण्यावरून मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. तुझी नोकरी व यापुढील आयुष्य हे उध्वस्त करून टाकेल, अशी भाषा वापरून मला जीवे मारण्याची धमकी दिली आहे असं या चिठ्ठीत केमदारणे यांनी लिहिलेलं आहे. सध्या केमदारणे यांचा शोध घेतला जात आहे.
RWA
(19.4 ov) 102
|
VS |
BRN
105/2(17.2 ov)
|
Bahrain beat Rwanda by 8 wickets | ||
Full Scorecard → |
BRN
(19 ov) 89
|
VS |
TAN
90/0(10.1 ov)
|
Tanzania beat Bahrain by 10 wickets | ||
Full Scorecard → |
GER
(20 ov) 219/7
|
VS |
MAW
182/7(20 ov)
|
Germany beat Malawi by 37 runs | ||
Full Scorecard → |
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.