'आदित्य ठाकरेंचा ड्रग्स व्यवसायात सहभाग, उद्धव ठाकरेंनी त्यांना...', दिशा सालियनच्या वडिलांचे गंभीर आरोप

उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप निलेश ओझा यांनी केला आहे.  

शिवराज यादव | Updated: Mar 25, 2025, 08:45 PM IST
'आदित्य ठाकरेंचा ड्रग्स व्यवसायात सहभाग, उद्धव ठाकरेंनी त्यांना...', दिशा सालियनच्या वडिलांचे गंभीर आरोप

दिशा सालियानचे वडिल सतिश सालियान आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत आपली तक्रार नोंदवली आहे. दिशा सालियनची हत्या झाली तेव्हा आदित्य ठाकरे कुठे होते असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. सतिश सालियान आणि त्यांच्या वकिलांनी या प्रकरणात आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत.
 
दिशा सालियानची हत्या झाली असा आरोप करत या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका दिशाचे वडिल सतीश सालियान यांनी हायकोर्टात दाखल केली आहे. त्यानंतर आता सतिश सालियान आणि त्यांचे वकील निलेश ओझा यांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेत तक्रार दाखल केली आहे. यावेळी बोलताना सतीश सालियान यांचे वकील निलेश ओझा यांनी आदित्य ठाकरेंसंह उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना वाचवलं असल्याचा आऱोपही त्यांनी केला आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप निलेश ओझा यांनी केला आहे.

आदित्य ठाकरे हे ड्रग्स व्यवसायात सहभागी असल्याचा गंभीर आरोप वकील निलेश ओझा यांनी केला आहे. 

दिशाच्या वडिलांचे नेमके आरोप काय?

- दिशाच्या वडिलांकडून मुंबई पोलीस आयुक्तांची भेट

- दिशा सालियनची हत्या झाली तेव्हा आदित्य ठाकरे कुठे होते? 

- आदित्य ठाकरे, डिनो मोरया, सुरज पांचोली परमबीर सिंग, सचिन वाझे, रिया चक्रवर्तीला आरोपी करण्याची विनंती

- उद्धव ठाकरेंनी मुलाला वाचवण्यासाठी पदाचा दुरुपयोग केला. त्यांनाही आरोपी करावं

- आदित्य ठाकरेंचा ड्रग्स व्यवसायात सहभागी 

- दिशाचा मित्र स्टिव्ह पिन्टो कुठं गायब झाला?

वकील निलेश ओझा यांनी केलेल्या आरोपांवर आदित्य ठाकरेंनी बोलण्यास नकार दिला आहे.

मागील 5 वर्षांपासून चर्चेत असलेलं दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.  दिशाच्या वडिलांनी पुन्हा चौकशी करण्याची मागणीची याचिका हायकोर्टात दाखल करत आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले आहेत. आता दिशाच्या वडिलांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेत तक्रार दिली आहे आणि पुन्हा आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केलेत. या आरोपांवरून एकच खळबळ उडाली आहे.