Disha Salian Murder Case: महाराष्ट्राच्या विधानसभेचा आजचा दिवस दिशा सालियन प्रकरणातील आरोप-प्रत्यारोपांवरुन गाजला. भाजप आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केलेयत. यामुळे महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. काय म्हणाले नितेश राणे? विधानसभेत काय घडलं? याबद्दल सविस्तर जाणून घ्या.
मुद्दा सरळ सोप्पा होता. काल कोर्टात दुधाच्या वडिलांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आमची मागणी एवढीच मागणी एखाद्या बहिणीवर अत्याचार झाला असेल तर त्वरीत कारवाई केली पाहिजे, असे नितेश राणे म्हणाले. दिशा सालियन हिच्या वडिलांनी ज्या ज्या लोकांनी नावे घेतली आहे त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली पाहिजे. चिमाजी आढाव नावाचा एक अधिकारी होता तो त्या प्रकरणात होता. ज्या अधिकाऱ्यावर आम्हाला संशय होता तोच चौकशी करत होता. मग आम्ही कसे जाणार? नंतर मी पत्र लिहून याबाबत सांगितलं होत. ज्या तीन लोकांची नाव या याचिकेत आहे त्यांना अटक करून चौकशी करावी असा मुद्दा आज सभागृहात उपस्थित करण्यात आल्याची माहिती नितेश राणेंनी माध्यमांना दिली.
दिशा सालियनच्या वडिलांनी पिटीशन दाखल केलं त्यानुसार आम्ही सभागृहात एवढी मागणी केली आहे कीं आमच्या बहिणीवर बलात्कार होतो, त्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांना ताब्यात घ्यावं चौकशी करावी अटक करावी अशी आमची मागणी आहे. सरकारने या सगळ्याची दखल घ्यावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. SIT च्या अधिकाऱ्यांना काय पत्र दिलं हे तुम्हाला माहिती आहे का? चिमाजी आढाव नावाचा एक अधिकारी यामध्ये केसमध्ये इन्व्हॉल्व्ह होता त्याला केस मध्ये ठेवू नये असा म्हणालो होतो. आता त्याच्या समोर चौकशीला मी समोर जाणार कसा? असं पत्र मी एसआयटी ला दिलं होतं, अशी माहिती नितेश राणेंनी सभागृहात दिली.
दिशा सालियानच्या वडिलांनी 3 नाव दिली आहेत, त्यांना अटक करावी अशी मागणी आम्ही केली. आपला देश कायद्यानुसार चालतो आणि कायद्यानुसार ही अटक व्हायला हवी. लाडक्या बहिणीने राज्य आणला आहे त्यामुळे त्यांना सुरक्षा देणे गरजेचे आहे.कलानगर भागात किंवा इतरत्र शक्ती कपूर फिरत असेल त्यांना अटक केली पाहिजे, असा टोला नितेश राणेंनी लगावला.
सरकारचे प्रमुख काय निर्णय घेतात हे आम्ही बघू. यावर बलात्काराचा आरोप आहे त्यांना तातडीने अटक केली जावी, असे सुप्रीम कोर्ट चा कायदा असा म्हणतो. आदित्य ठाकरे आमदार आहेत त्यामुळे ते दबाव आणू शकतात. त्यामुळे नैतिकता म्हणून आमदार राहू नये. आपण काळा ठपका का लावून घेतो याचा विचार आदित्य ठाकरे यांनी केला पाहिजे आपण त्यादिवशी कुठे होतो? आपलं मोबाईल लोकेशन काय होतं? ते सगळ्यांची उत्तर द्यावे.नितेश राणे खोटे बोलत आहेत हे त्यांनी सांगावं. ते पळत का आहेत? असा प्रश्नही त्यांनी विचारला.
उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना दोनदा फोन केला. 'तुम्हालाही दोन मुलं आहेत, मलाही दोन मुलं आहेत', असं ते फोनवर म्हणाल्याचा दावा नितेश राणेंनी केला. आदित्य ठाकरे निर्दोष असतील तर 8 जून 2020 रोजी ते कुठे होते ते सांगा, असा प्रश्न नितीश राणे यांनी उपस्थित केला आहे.