साईनगरीतील कुत्र्यांना केस गळती, पोटात जंतूची समस्या; काय आहे प्रकार? कारण धक्कादायक!

Dogs in Shirdi: शिर्डीतील कुत्र्यांना मधुमेहाची लागण झालीय. 

Pravin Dabholkar | Updated: Mar 24, 2025, 06:53 AM IST
साईनगरीतील कुत्र्यांना केस गळती, पोटात जंतूची समस्या; काय आहे प्रकार? कारण धक्कादायक!
शिर्डी

Dogs in Shirdi: शिर्डीमध्ये सध्या नवी समस्या निर्माण झालीयं. साई मंदिर परिसरातील कुत्र्यांना मधुमेह झाल्याचं निष्पन्न झालंय. शहरातील अनेक कुत्र्यांचे केस गळाले असून, पोटात जंतू झाल्याने ते आजारी पडत आहेत. काय आहे हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया.

साईनगरी शिर्डीमध्ये देशभरातून कोट्यवधी भाविक साईंच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात. अनेक भाविक श्रद्धेपोटी परिसरातील कुत्र्‍यांना प्रसाद खाऊ घालतात. मात्र या प्रसादामुळे या कुत्र्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरतोय. कारण साई मंदिर परिसरातील कुत्र्‍यांना मधुमेह झाल्याचं समोर आलंय.गोड पदार्थांच्या अतिसेवनामुळे कुत्र्‍यांना अनेक व्याधींनीही ग्रासलंय.

शिर्डीतील कुत्र्यांना मधुमेहाची लागण झालीय. शिर्डीतील कुत्रे लठ्ठ, सुस्तावलेले आणि त्वचारोगाने ग्रासलेले दिसतायत. मोफत मिळणारा प्रसाद भाविक कुत्र्यांना देतात. यात बुंदीचे लाडू, पेढे,बिस्कटांचं अतिरेकी आहार कुत्र्यांना दिला जातो.  अनावश्यक साखर कुत्र्यांच्या पोटात गेल्याने जंतांचा त्रास होतो. त्यामुळे अनेक कुत्र्यांना केस गळतीचा त्रास होऊ लागलाय. 

मंदिराच्या दीड किलोमीटर परिघातील कुत्रे धष्टपुष्ट झाले आहेत.या उलट दोन किलोमीटर परिघाबाहेरील कुत्रे तरतरीत असल्याचं पहायला मिळतंय.  त्यामुळे साईभक्तांनी कुत्र्यांना गोड पदार्थ खावू घालू नये असं आवाहन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केलंय.

कुत्र्यांचं आयुष्यमान साधारण 10 ते 12 वर्ष असतं. मधुमेहासारख्या आजारांमुळे ते आणखी कमी होऊ शकतं. त्यामुळे शिर्डीतील या समस्येवर भाविकांमध्ये जनजागृती आणि कुत्र्‍यांच्या आरोग्यासाठी महत्वाची पावलं उचलणं गरजेचं आहे.