Driving License बाबत अत्यंत महत्त्वाची बातमी, RTO ला कडक सूचना

, परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एकूण अजपैिकी पाच टक्के अर्जदारांची पुन्हा चाचणी घेण्यात यावी.

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 11, 2025, 07:56 PM IST
Driving License बाबत अत्यंत महत्त्वाची बातमी, RTO ला कडक सूचना

वाढत्या अपघातांची संख्या आणि रस्त्यांवर गुणवत्तापूर्ण चालकांची गरज लक्षात घेऊन परिवहन विभागाने ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) चाचणी प्रक्रियेत क्रांतिकारी बदल करत ती अधिक पारदर्शक आणि कठोर करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय रस्ते सुरक्षेच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे.

Add Zee News as a Preferred Source

काय आहेत नवीन नियम?

ऑनलाइन अपॉइंटमेंट अनिवार्य: पक्क्या (कायमस्वरूपी) लायसन्ससाठी आता परिवहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन अपॉइंटमेंट घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे एजंटगिरीला आळा बसेल आणि प्रक्रियेत सुसूत्रता येईल.

सीसीटीव्ही (CCTV) निगराणी: तात्पुरत्या चाचणी मार्गांवर (Testing Tracks) आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. यामुळे चाचणी प्रक्रियेतील प्रत्येक हालचाल रेकॉर्ड होईल आणि गैरप्रकारांना वाव राहणार नाही.

अधिकाऱ्यांची अनिवार्य उपस्थिती: चाचणी दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे, जेणेकरून संपूर्ण प्रक्रिया नियमांनुसार पार पडेल.

कागदपत्रांची काटेकोर तपासणी: अर्जदारांच्या कागदपत्रांची तपासणी अत्यंत कठोरपणे केली जाईल, ज्यामुळे केवळ वैध आणि पात्र अर्जदारांनाच चाचणी देण्याची परवानगी मिळेल.

पाच टक्क्यांची पुनर्चाचणी: चाचणीत उत्तीर्ण झालेल्या एकूण अर्जदारांपैकी पाच टक्के लोकांची अचानकपणे (Randomly) पुनर्चाचणी घेतली जाईल. यामुळे चाचणी प्रक्रियेची विश्वासार्हता वाढेल.

गैरव्यवहार झाल्यास कठोर कारवाई

परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे की, चाचणी दरम्यान किंवा प्रक्रियेत कोणताही गैरव्यवहार किंवा भ्रष्टाचार आढळल्यास संबंधित अर्जदार तसेच अधिकाऱ्यांवर तत्काळ आणि कठोर कारवाई केली जाईल.

'उत्तीर्ण'चे प्रमाण 90  टक्क्यांपेक्षा जास्त कसे ?

वाहन चालवण्याच्या चाचणीत अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण दहा टक्क्यांपेक्षा कमी असेल तर प्रादेशिक परिवहन अधिकारी व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी काटेकोर लक्ष ठेवावे. तसेच, परीक्षा उत्तीर्ण झालेल्या एकूण अजपैिकी पाच टक्के अर्जदारांची पुन्हा चाचणी घेण्यात यावी. त्याचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या शेवटी सादर करावा लागणार आहे. त्यामुळे पक्का वाहन परवाना देण्यासाठी कोटेकोरपणे लक्ष दिले जाणार आहे.

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More