)
Eknath Khadse House Robbery : माजी विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या जळगावातील घरात चोरट्याने डल्ला मारला. या चोरीत घरातील मौल्यवान दागिने चोरांनी लंपास केले. पण ही चोरी नेमकी का झाली याचा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी खुद्द केला आहे. चोरीचा घटना समोर आल्यावर खडसे तातडीने जळगावात पोहोचले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना घरातून काय काय गेलं याची माहिती दिली. त्यानंतर मोठी आणि महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एकनाथ खडसे यांच्या बेडरूममधील कपाटातून काही सीडी आणि पेनड्राईव्हदेखील चोरट्यांनी चोरल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे. भाजपला रामराम केल्यानंतर एकनाथ खडसे कायम एका सीसीडीचा उल्लेख करत होते. वेळ आल्यावर ती सीडी जगासमोर दाखवले असं ते म्हणायचे. त्यामुळे तीच सीडी चोरीमध्ये गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
जळगावात शिवराम नगर इथल्या आमदार एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी झाल्याची घटना समोर आल्यानंतर आज एकनाथ खडसे तातडीने जळगावात गेले. त्यांनी घरामधील चोरी झालेल्या खोल्यांची पाहणी केली असता त्यांच्या लक्षात आलं की,त्यांच्या बेडरूम मधून चोरट्यांनी काही सीडीजदेखील चोरी केल्या आहेत. खडसेंनी सांगितलं की, ज्या कामाच्या सीडी आहेत, त्या बेडरुममध्ये नव्हत्या. त्या दुसऱ्या ठिकाणी ठेवलेल्या होत्या.
एकनाथ खडसे यांनी त्यांच्या बेडरूममधील कपाटात ठेवलेल्या सर्व सीडीज तपासल्या असता त्यांच्या लक्षात आलं की एका पाकिटामध्ये काही सीडी ठेवल्या होत्या. त्याच्यावर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. खडसे यांनी कामाच्या सीडी सुरक्षित असल्याचे सांगितलं आहे. तरी चोरट्यांनी खडसेंच्या थेट बेडरुममध्ये जाऊन काही सीडी आणि पेन ड्राईव्ह चोरुन नेल्या आहेत.
एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम केल्यानंतर अनेक वेळा म्हटलं की, तुमच्याकडे ईडी असेल तर आमच्याकडे सीडी आहेत. कधी भाषणातून तर कधी पत्रकार परिषदातून त्यांनी त्या सीडीचा उल्लेख केला आहे. वेळ आल्यावर ती सीडी जगासमोर आणेल असं ते वारंवार म्हणायचे. त्यामुळे खडसे दावा करत असलेल्या त्या सीडीसाठी ती चोरी झाली तर नाही ना? असा प्रश्न आता उपस्थितीत करण्यात येत आहे.
चोरट्यांनी दहा सीडीज चोरूल्या असून उर्वरित सात सीडीज शिल्लक आहेत तर घरातले सर्व 25 ते 30 पेन ड्राईव्ह देखील चोरून नेल्याचा आरोप एकनाथ खडसे यांनी केला.चोरट्यांनी 868 ग्रॅम एवढं सोनं आणि 35 हजार रुपये एवढा मुद्देमाल चोरला आहे, अशी माहिती मिळते.
प्रश्न १: एकनाथ खडसे यांच्या घरात चोरीची घटना नेमकी काय आहे?
उत्तर: जळगावातील शिवराम नगर येथील माजी मंत्री आणि विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी चोरी झाली आहे. चोरट्यांनी घरातील मौल्यवान दागिने लंपास केले आहेत. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
प्रश्न २: चोरीची घटना कधी समजली आणि एकनाथ खडसे यांनी काय केले?
उत्तर: चोरीची घटना समजताच एकनाथ खडसे यांनी तातडीने २९ ऑक्टोबर २०२५ रोजी जळगावात दाखल होऊन घराची पाहणी केली. त्यांनी चोरी झालेल्या खोल्यांची तपासणी केली आणि पोलिसांना सहकार्य करत आहेत.
प्रश्न ३: चोरीत सीडी आणि पेनड्राईव्हचे काय घडले?
उत्तर: चोरट्यांनी वरच्या मजल्यावरील एकनाथ खडसे यांच्या बेडरूममधील कपाटातून एका पाकिटातील काही सीडी आणि पेनड्राईव्ह चोरून नेल्या आहेत. खडसे यांनी स्वतः ही माहिती दिली आहे.