Eknath Khadse: पुण्यातील कोरेगाव पार्क येथील महार वतन जमीन आयटी पार्कसाठी खरेदी करताना मुद्रांक शुल्कात कोट्यवधी रुपयांची माफी घेतली आणि नियमबाह्य फायदे घेतले, असा आरोप पार्थ पवार यांच्यावर करण्यात येत आहे. या प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांवरही टिका होत आहे. अजित पवारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांकडून करण्यात येत आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनीही अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे की, काल संध्याकाळी झी 24 तासवर ही बातमी पाहिली. हे प्रकरण गंभीर आहे. ही जमिन महारवतनाची असून त्यासाठी महसूल आयोगाकडून परवानगी घ्यावी लागते. ती घेतलेली नाही. तसंच, ज्यांचे भांडवलच 1 लाख आहे त्यांनी 300 कोटी कुठून आणले. जर बेकायदेशीर व्यवहार झाला असेल तर जमिन मुळ मालकाला परत दिली जातात. मात्र यात कोणतीही बेकायदेशीर व्यवहार झाल्यानंतर मुळ मालकाला परत जातात मात्र यात कोणतीही कारवाई अजून झालेली दिसत नाहीये. मला वाटतं याची चौकशी व्हायला हवी, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
हजार कोटींची जमीन असेल 24 तासांच्या आत स्टॅम्प ड्युटी माफ करणे हे कोणाचा वरदहस्त असल्याशिवाय इतक्या वेगाने या गोष्टी होणं शक्य नाही. चौकशी होईल. 70 हजार कोंटीच्या घोटाळ्यातून अजित पवार मुक्त झाले तसे हे देखील होईल.त्यामुळं याची चौकशी ही सरकारच्या माध्यमातून न करता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या माध्यमातून झाली तर जनतेला विश्वास बसेल. यात त्यांचा मुलगा असल्यामुळं जोपर्यंत नैतिक जबाबादारी स्वीकारुन अजित पवारांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी एकनाथ खडसेंनी केली आहे.
उत्तर: पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 'महार वतन' जमीन आयटी पार्कसाठी खरेदी करताना पार्थ पवार यांनी मुद्रांक शुल्कात (स्टॅम्प ड्युटी) कोट्यवधी रुपयांची माफी घेतली आणि नियमबाह्य फायदे घेतले, असा त्यांच्यावर आरोप आहे.
उत्तर: खडसे यांच्या मते, ही जमीन 'महार वतन' प्रकारची आहे. अशा जमिनीच्या व्यवहारासाठी महसूल आयोगाकडून परवानगी घेणे आवश्यक असते, जी या प्रकरणात घेतलेली नाही. तसेच, ज्या कंपनीचे भांडवल केवळ ₹१ लाख आहे, तिने ₹३०० कोटी कुठून आणले, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
उत्तर: हजारो कोटींची जमीन असेल, तरी २४ तासांच्या आत स्टॅम्प ड्युटी माफ करणे हे कोणाचा तरी 'वरदहस्त' (आशीर्वाद/ पाठिंबा) असल्याशिवाय शक्य नाही.बेकायदेशीर व्यवहार झाल्यास जमीन मूळ मालकाला परत केली जाते, परंतु या प्रकरणात अजून कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही.
मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.