ब्युरो रिपोर्ट झी 24 तास: मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीमधील सत्तासंघर्षावर एकनाथ शिंदेंनी पडदा टाकलाय. या सर्व महानगरपालिकांमध्ये महायुतीचाच महापौर बसणार असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय.. तसंच मुंबई महानगरपालिकेच्या महापौरपदावरून एकनाथ शिंदेंनी विरोधकांना
देखील सुनावलं आहे... पाहुयात
मुंबई महापौरपदासाठी भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. भाजपवर दबाव टाकण्यासाठीच शिंदेंनी नगरसेवकांची हॉटेलवारी सुरू केल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती, एवढंच नव्हे तर ठाकरे-भाजप देखील सत्तेसाठी समिकरण जुळवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती, मात्र या सर्व चर्चांना एकनाथ शिंदेंकडून पूर्णविराम देण्यात आलाय, मुंबईत महायुतीचाच महापौर होणार त्यामुळे बहुमत नसणा-यांनी स्वप्न पाहणं चुकीचं असल्याचं एकनाथ शिंदेंनी म्हटलंय..
महापौरपदासाठी आमच्यामध्ये कोणतीही रस्सीखेच नाही, एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण दिले. ज्यांच्याकडे बहुमत नाही त्यांनी स्वप्न पाहणं चुकीचं, शिंदेंचा विरोधकांना टोला लगावला.
भाजप आणि शिवसेना अनेक ठिकाणी एकमेकांविरोधात लढली आहे. तसंच अनेक पालिकांमध्ये भाजप-शिवसेनेनं युती करत निवडणूक लढवली. मात्र, ज्या ठिकाणी भाजप-शिवसेनेमध्ये टोकाची लढाई पाहायला मिळाली होती, त्या ठिकाणी दोन्ही पक्षांकडून स्वतंत्र सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या होत्या, दरम्यान यावरही एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण देत दोन्ही पक्षामधला वाद कमी करण्याचा प्रयत्न केलाय...
ठाकरेंच्या शिवसेनेनं बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान केलाय. त्यामुळे मुंबईच्या जनतेनं उद्धव ठाकरेंना नाकारल्याची टीका. भाजप नेते नवनाथ बन यांनी केलीय.. तसंच मुंबईत महायुतीचाच महापौर होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय...
मुंबईत पालिकेत जनतेनं महायुतीवर विश्वास दाखवत स्पष्ट बहुमत दिलं. दरम्यान यानंतर भाजप-शिवसेनेत महापौरपदावरून बिनसल्याची
चर्चा होती, त्यामुळे मुंबईत सत्तेची समिकरणं बदलणार अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र, या सर्व शक्यतांवर एकनाथ शिंदेंनी पडदा टाकत मुंबईत महायुतीचाच महापौर होणार असल्याचं स्पष्ट केलंय..
तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे. 'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे.
...Read More|
AUS
(20 ov) 181
|
VS |
SL
184/2(18 ov)
|
| Sri Lanka beat Australia by 8 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
(20 ov) 202/7
|
VS |
ITA
178(20 ov)
|
| England beat Italy by 24 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
UAE
(20 ov) 160/9
|
VS |
AFG
162/5(19.2 ov)
|
| Afghanistan beat United Arab Emirates by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.