Laadki Bahin Yojna: लाडक्या बहिणींना 2100 ची ओवाळणी मिळणार; एकनाथ शिंदेंनी केलं जाहीर, हिवाळी अधिवेशनात घोषणेची शक्यता
विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला जादूई आकडा गाठता आला. त्यामुळे महायुतीच्या जाहीरनाम्यातून दिलेल्या वचनाप्रमाणे लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपयांची ओवाळणी मिळणार आहे..
विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीला जादूई आकडा गाठता आला. त्यामुळे महायुतीच्या जाहीरनाम्यातून दिलेल्या वचनाप्रमाणे लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपयांची ओवाळणी मिळणार आहे..
विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरलीये. निवडणुकीत महिलांच्या मतांचा टक्का वाढला. हा टक्का म्हणजे राज्यातील बहीणींनी भावांना दिलेला आशीर्वाद असल्याचा दावा महायुतीचे नेते करतायेत. त्यामुळं महायुतीच्या जाहीरनाम्यातील वचनाप्रमाणे राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये देण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केलंय.
2100 रुपये देण्याचं जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विरोधकांवरही निशाणा साधलाय. 'माझी बहिण लाडकी, विरोधकांच्या मनात भरली धडकी' असं म्हणत विरोधकांवर टीका केलीये. आश्वासन दिल्याप्रमाणे सत्ता स्थापनेनंतर 5 किंवा 6 तारखेला सुरु होणाऱ्या नागपूर हिवाळी अधिवेशनात मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात लाडकी बहिण योजनेची रक्कम 1500 वरुन 2100 करण्यासाठी वाढीव तरतुदीचा निर्णय घेण्यात येणाराये..
आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे.. या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकार केलेल्या घोषणेची पूर्तता करण्यासाठी हालचाली करणार आहे... त्यामुळे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना 1500 वरून 2100 रुपये रिटर्न गिफ्ट मिळणार आहे.. हे रिटर्न गिफ्ट म्हणजे पुढच्या निवडणुकीची गुंतवणूक असणार आहे.