)
Eknath Shinde Dasara Melava 2025: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मेळाव्यातून रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत त्यांनी खळबळजनक दावे केले आहेत. उद्धव ठाकरेंनी 30 वर्ष फक्त टक्क्याचं राजकारण केलं असून, मला मुंबई महापालिकेत जाण्याचा अधिकार नव्हता अशी आमची अवस्था होती असा दावा केला आहे. ज्यांनी बाळासाहेबांना 50 वर्ष साथ दिली, त्यांना संपवण्याचा विडा उचलला आहे असा आरोपही केला.
"उद्धव ठाकरेंनी 30 वर्षं फक्त टक्क्यांचं राजकारण केलं. मला मुंबई महापालिकेत जाण्याचा अधिकार नव्हता अशी आमची अवस्था होती. उद्धव ठाकरेंना राजकारणात बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का?," असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
"शिदेंना विनंती आहे की, शिवसेना प्रमुखांचे निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीत ठेवली? ही माहिती काढा. मी जबाबदारीने बोलत असून मोठं विधान करत आहे. त्यांच्यावर उपचार करणारे डॉक्टर यांना विचारा. 2 दिवस त्यांची बॉडी का ठेवली? काय अंतर्गत सुरु होतं?,' असे प्रश्न त्यांनी विचारले आहेत.
"8 दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर झोपलो होतो, सगळं कळत होतं. पण हे सगळं कशासाठी सुरु होतं. कोणीतरी सांगितलं बाळासाहेब यांच्या हाताचे ठसे का घेतले? मातोश्रीत सगळी चर्चा सुरु होती. बाळासाहेब यांचे मृत्युपत्र कोणी तयार केलं? कधी झालं त्यावर कोणी सही केली? ही सगळी माहिती काढा," असंही रामदास कदम म्हणाले आहेत.
शिवसेना आम्ही मोठी केली, तुम्ही काय शिकवता. ज्यांनी बाळासाहेबांना 50 वर्ष साथ दिली त्यांना संपवण्याच विडा उचलला आहे. बाळासाहेब गेल्यानंतर माझी शिवाजी पार्कातील भाषणं बद झाली. कसली भीती वाटते अशी विचारणा यांनी केली आहे.
तिकडचे नेते पाहून मला हसायला आलं. कुठे दत्ता साळवी, दत्ता नलावडे, कुठे वामनराव महाडिक आणि आता ते व्यासपीठ पाहून डोळ्यात पाणी आलं. उद्धव ठाकरे तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा हव्यास होता. सेना प्रमुखांच्या विचारांना उद्धव ठाकरे यांनी तिलांजली दिली, काळिमा फासलं. इथे जमलेले मावळे आहेत तिकडे जमलेले सगळे डोम-कावळे आहेत. मुंबईतला माणूस उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाला गाडून टाकल्याशिवाय राहणार नाहीत. जिथे आमच्या गिरण्या होत्या तिथे ५० मजली बिल्डिंग झाल्या तिथे एक ही मराठी माणसाचे घर नाही असंही रामदास कदम यांनी म्हटलं.