Local Body Election: निवडणुकांचं बिगुल वाजलं! नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या तारखा जाहीर, जाणून घ्या A टू Z माहिती

Nagar Parishad Nagar Panchayat Election Schedule: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Nov 4, 2025, 04:54 PM IST
Local Body Election: निवडणुकांचं बिगुल वाजलं! नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या तारखा जाहीर, जाणून घ्या A टू Z माहिती

Nagar Parishad Nagar Panchayat Election Schedule: राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाने 31 जानेवारी 2026 पूर्वी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक घेण्याचे निर्देश दिले आहेत असं सांगत नगरपरिषद, नगर पंचायत निवडणुकांसंदर्भात घोषणा केली. 2 डिसेंबर 2025 ला मतदान होणार असून, 3 डिसेंबर 2025 ला मतमोजणी होणार आहे. संबंधित मतदारसंघांमध्ये आचासंहिता लागू झाल्याचं राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम 

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख  - 10 नोव्हेंबर 2025
उमेदवारी अर्जसाठी अंतिम मुदत - 17 नोव्हेंबर
छाननी - 18 नोव्हेंबर
माघार घेण्याची मुदत - 21 नोव्हेंबर
मतदान - 2 डिसेंबर
मतमोजणी - 3 डिसेंबर
शासन अधिकृत निकाल - 10 डिसेंबर 

आचारसंहिता लागू

निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून संबंधित नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. आचारसंहिता जरी नगरपरिषद, नगरपंचायतींच्या कार्यक्षेत्रात लागू असली तरी काही निर्णय, कार्यक्रम जर येथील मतदारांवर प्रभाव करणारे असतील तर तेदेखील आचारसंहितेमध्ये येईल असं सांगण्यात आलं आहे. 

विभागनिहाय नगरपरिषद - नगरपंचायत निवडणुका

कोकण - 27
नाशिक - 49 
पुणे - 60 
छत्रपती संभाजीनगर - 52
अमरावती - 45 
नागपूर - 55 

246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात येणार आहेत. यामधून 6859 सदस्य आणि 288 अध्यक्ष यांची निवड होणार आहे. 246 नगरपरिषदांमध्ये 10 नवीन नगरपरिषदांचा समावेश आहे. 15 नवीन नगरपंचायत आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली. 

147 नगरपंचायती आहेत, त्यातील 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक होत आहे.  27 नगरपंचायतींची मुदत संपलेली आहे असंही यावेळी सांगण्यात आलं. 31 ऑक्टोबरपर्यंत मतदार याद्या अंतिम केल्या जातील. मतदार याद्या ७ नोव्हेंबर रोजी जाहीर होणार अशी माहिती देण्यात आली. 

13 हजार 355  मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. ईव्हीएमने निवडणुका होणार आहेत. तसंच जात वैध प्रमाणपत्र देण्यासाठी 6 महिन्याचा अवधी असेल. मतदारांना मोबाईल अॅपद्वारे मतदान केंद्र, यादीतील नाव, उमेदवाराची माहिती मिळेल. उमेदवारांविषयीची माहितीही अॅपच्या माध्यमातून मिळणार आहे असंही सांगण्यात आलं आहे. 

 

दुबार मतदारांसंदर्भात काय दक्षता घेणार?

दुबार नाव असलेल्यांवर संभाव्य दुबार नावांबाबत दक्षता घेण्यात आली आहे. टुलद्वारे याचा शोध घेऊन संभाव्य दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार करण्यात आलं आहे. दुबार मतदारासमोर डबल स्टार आलं आणि त्याने रिस्पॉन्स दिला नाही तर त्या मतदाराकडून एक डिक्लेरेशन घेतलं जाईल. कुठल्याही मतदान केंद्रावर मतदान केलं नाही असं लिहून घेतलं जाईल. या मतदान केंद्रानंतर दुसरीकडे मतदान करणार नाही असं त्याच्याकडून लिहून घेतलं जाईल असे राज्य निवडणूक आयोगने सांगितलं आहे. 

दुबार मतदारांची वेगळी नोंद केलेली असणार आहे. त्यामुळे दुबार मतदारांना त्यांच्या मतदार संघात मतदान करता येणार आहे असे राज्य निवडूक आयोगाने म्हटले आहे.

About the Author

Shivraj Yadav

शिवराज यादव, झी 24 तासमध्ये डेप्युटी न्यूज एडिटर पदावर कार्यरत आहेत. 2009 मध्ये न्यूज फोटोकॉर्प या न्यूज फोटो एजन्सीतून त्यांनी आपल्या पत्रकारितेला सुरुवात केली. 16 वर्षांच्या दीर्घ काराकिर्दीत त्यांनी  टीव्ही 9, जय महाराष्ट्र, मी मराठी या टीव्ही चॅनेल्समध्ये इनपुट विभागात काम केलं. याशिवाय त्यांनी अनेक प्रसंगी रिपोर्टिंगही केलं आहे. इलेक्ट्रॉनिक मीडियानंतर त्यांनी ऑनलाइन मीडियामध्ये काम करण्यास सुरुवात केली. लोकमत, लोकसत्ता या आघाडीच्या वृत्तपत्रांच्या डिजिटल विभागात केल्यानंतर सध्या झी 24 तासमध्ये कार्यरत आहेत. चालू घडामोडी, राजकारण, क्राइम, स्पोर्ट्स आणि तंत्रज्ञान विषयांवर वाचण्याची आणि लिहिण्याची आवड आहे. याशिवाय सिनेमा, वेब सीरिज यांच्याकडे विश्लेषणात्मक दृष्टीकोनाकडे पाहत त्यावर चर्चेची आणि लिखाणाची आवड आहे. 

...Read More