Eknath Shinde On Nashik Sabha Devendra Fadnavis Criticism: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी, 'झी 24 तास'च्या 'टू द पॉइण्ट वीथ कमलेश सुतार' या विशेष कार्यक्रमात नाशिकमधील सभेत केलेल्या टीकेवरुन भाष्य केलं आहे. याच टीकेवरुन मुख्यमंत्र्यांनी 'त्यांना (शिंदेंना) जुन्या बॉसची सवय लागली असेल टोमणे मारायची,' असा टोला लगावला होता. आता याच टोल्याचा संदर्भ देत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर शिंदेंनी आपली भूमिका मांडली आहे.
नाशिकमध्ये भाषणात शहर दत्तक घेण्यावरुन तुम्ही नाशिकमधील सभेतून मुख्यमंत्र्यांना टोला लगावला, असं म्हणत 'झी 24 तास'चे संपादक कमलेश सुतार यांनी प्रश्न विचारला असता एकनाथ शिंदेंनी, "मुख्यमंत्र्यांना नाही राज ठाकरेंनी दत्तक घेतलं होतं," असं म्हटलं. त्यावर कमेल सुतार यांनी त्यांना संदर्भ देत, "राज ठाकरेंची सत्ता होती दत्तक मुख्यमंत्र्यांनी घेतलं होतं," असं म्हटलं. यावरही शिंदेंनी, "नाही नाही राज ठाकरेंनी त्याला दत्तक घेतलं होतं. राज स्वत: तिकडे गेलेले. नाशिककरांना योग्य विकास करता आला नाही," असं म्हटलं.
"मुख्यमंत्री म्हणाले जुन्या बॉसची टोमणे मारण्याची सवय लागली आहे," असा संदर्भ शिंदेंना देण्यात आला. त्यावर ते मिश्कील हसले आणि त्यांनी, "मला हे माहिती नाही. मी मुख्यमंत्री डोक्यात ठेऊन हे बोललोच नाही. मी राज ठाकरे समजूनच बोललो. मी कशाला मुख्यमंत्र्यांना बोलेल?" असा प्रतीसवाल केला.
नक्की वाचा >> गणेश नाईकांच्या 'टांगा पलटी अन् घोडे बेपत्ता' इशाऱ्यावर शिंदे म्हणाले, 'मी CM झाल्यापासून...'
प्रचाराला पूर्ण वेळ मिळाला नाही? असं विचारण्यात आला असता शिंदेंनी, "वेळ कमी आहे. कमी वेळात जास्त काम करायची सवय आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे कमी वेळ मिळाला. युती आघाडी यासाठी कमी वेळ मिळाला. निवडणुका असू द्या नसू द्या काम सुरु असतं. उमेदवारांची निवड, मुंबईचा युतीचा विषय यावर चर्चा वगैरे सगळं झालं," असं सांगितलं.
बऱ्याच ठिकाणी मित्रपक्षांसोबत लढावं लागतंय, याबद्दल विचारलं असता शिंदेंनी, "काही ठिकाणी झाली युती. काही ठिकाणी वेगळं लढतोय. कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याने लढली पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. त्यामुळे निवडणूक होणार आहे, फ्रेंडली फाईट प्रकारामध्ये," असं सांगितलं.
आम्ही युतीचं पालन करतोय इतरांनाही करावं, या फडणवीसांच्या सल्ल्यावर यावर, "आमची दररोज चर्चा होते. उदय सामंत, राहुल शेवाळे, योगेश कदम हे भाजपा आणि मुख्यमंत्र्यांशी बोलत असतात. प्रत्येक अडचणीला उपाय आहे. चर्चेतून उपाय निघतो. मी मुख्यमंत्र्यांशी बोलतो. एखादा विषय आला तर कटूता निर्माण झाल्यास चर्चेतूनच मार्ग निघतो," असं शिंदे म्हणाले.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
SL
(20 ov) 163/6
|
VS |
IRE
143(19.5 ov)
|
| Sri Lanka beat Ireland by 20 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
(20 ov) 184/7
|
VS |
NEP
180/6(20 ov)
|
| England beat Nepal by 4 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AFG
(20 ov) 182/6
|
VS |
NZ
183/5(17.5 ov)
|
| New Zealand beat Afghanistan by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.