एक Reel कोट्यवधींचं? रीलस्टारच्या 'त्या' एका कृतीमुळं महाराष्ट्र विकला जातोय, राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य

Raj Thackeray News: राज ठाकरे यांनी झी 24 तासच्या To The Point With Kamlesh Sutar या विशेष मुलाखतपर पॉडकास्टमध्ये महाराष्ट्रातील जमिनी आणि रिल्सबद्दल बोलले आहेत.   

तेजश्री गायकवाड | Updated: Jan 11, 2026, 09:58 AM IST
एक Reel कोट्यवधींचं? रीलस्टारच्या 'त्या' एका कृतीमुळं महाराष्ट्र विकला जातोय, राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य

Exclusive Raj Thackeray In To The Point With Kamlesh Sutar: सध्या राज्यात राजकारणाचे जोरदार वारे वाहत आहेत. महापालिकेच्या निवडणुकीचा अवघे पाच दिवस शिल्लक आहेत. याच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी 'झी 24 तास'च्या 'टू द पॉइण्ट विथ कमलेश सुतार' या विशेष कार्यक्रमाला हजेरी लावली. या मुलाखतपर पॉडकास्टमध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर थेट उत्तर दिली आणि मतही मांडले. 'झी 24 तास'चे संपादक कमलेश सुतार यांनी ही मुलाखत घेतली. मुलाखतीच्या शेवटी दुर्लक्षित झालेला पण महाराष्ट्राच्या दृष्टीने फार महत्त्वाचा असलेला असा एक मुद्दा राज ठाकरेंनी मांडला. , हा मुद्दा होता रिल्स आणि त्यामुळे विकल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातील जमिनी यांचा. याबद्दल बोलत राज ठाकरेंनी फार महत्त्वाचा मुद्दा जनतेसमोर मांडला.  

Add Zee News as a Preferred Source

काय म्हणाले राज ठाकरे? 

"हे जे रिल्स करतात त्यांचा उद्देश वाईट नाही. चांगलाच आहे. आज अनेक मुलं अनेक मुली महाराष्ट्रातील रिल्स करतात. कारण त्यांना असं वाटतं की माझा प्रदेश लोकांनी बघावा. यात काहीच चुकीचं नाहीये. पण ही मूलं-मुली ज्या रिल्स करतात आणि आपल्या कोकणातले जे काही एरियल व्ह्यूज घेतात, जागा सांगतात, जागा दाखवतात यामुळे बाहेरची लोक आहेत त्यांना सोप्प झालं सगळं. कामच सोप्प केलं. रील पाहायच्या आणि माणसं पाठवायची.. कुठे आहे जमीन बघा आणि विकत घ्या. आपण आपापल्या इथला खजिना दाखवतोय कारण आपल्या मुलांना बघायला मिळेल की बघा आपल्याकडे काय काय आहे. आमचा समुद्र आहे, आमचे डोंगर, किल्ले कसे आहेत. आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्र्रात, कोकणामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा अजून कोणत्या ठिकाणी असेल हे दाखवायचं काम ती मुलं उत्साहात करत आहेत. त्यांच्या लक्षात येत नाही पण ते (बाहेरच्या राज्यातील लोक) जे सगळं बघत आहेत त्याच्यासाठी सोप्प झालंय." 

गोव्याची बरबादी 'अशी' झाली!

यावर 'झी 24 तास'चे संपादक कमलेश सुतार म्हणाले की, " असं तर सगळीकडेच होतं... " त्यावर राज ठाकरे म्हणाले की, " महाराष्ट्र आणि इतर जागा या वेगळ्या आहेत. अशामुळे गोवा बरबाद झालं ना...गोव्यांच्या जमिनींचा प्रश्न निर्माण झाला ना...कशातून झाला? या रिल्समधूनच झाला. जमिनी  दिसायला लागल्या. मला घरात बसून जमिनी घ्यायच्या आहेत महाराष्ट्रातील अरे वाह छान आहे ही (रिल्स बघून) जा जरा बघून ये कुठे आहे ही..."

 

अशा पद्धतीने राज ठाकरे यांनी कधीच जास्त न चर्चेत आलेला रिल्स आणि जमिनींचा मुद्दा झी 24 तासच्या मुलाखतपर पॉडकास्टमध्ये मांडला. मनोरंजन किंवा माहिती म्हणून बनवल्या जाणाऱ्या या रिल्समुळे आज महाराष्ट्रातील जमिनी विकल्या जाण सोप्प झालं आहे असं म्हंटल तरी वावगं झालं. 

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More