...म्हणून आम्हाला यश मिळेल याची मला खात्री वाटते; राज ठाकरेंनी सांगितलं 'ते' एक कारण

Exclusive Raj Thackeray In To The Point With Kamlesh Sutar: राज ठाकरेंनी आयुष्यात अशी निवडणूक बघितली नाही, असं तुम्ही म्हणालात याचा अर्थ काय? या प्रश्नाला उत्तर देताना सविस्तर भाष्य केलं आहे. ते का असं म्हणालेत जाणून घ्या

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 11, 2026, 10:03 AM IST
...म्हणून आम्हाला यश मिळेल याची मला खात्री वाटते; राज ठाकरेंनी सांगितलं 'ते' एक कारण
राज ठाकरेंनी मांडली भूमिका

Exclusive Raj Thackeray In To The Point With Kamlesh Sutar: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी 'झी 24 तास'च्या 'टू द पॉइण्ट विथ कमलेश सुतार' या विशेष कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमामध्ये 'झी 24 तास'चे संपादक कमलेश सुतार यांच्या अनेक प्रश्नांना मनमोकळेपणे उत्तरं दिली. मुलाखतीच्या सुरुवातीलाच राज ठाकरेंना, तुमच्या आयुष्यात अशी निवडणूक बघितली नाही, असं तुम्ही म्हणालात याचा अर्थ काय? असा सवाल विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. 

Add Zee News as a Preferred Source

पैशाच्या वापरला मर्यादाच नाही

"मीच काय अशी निवडणूक अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलेली नाही. लोकसभेपासूनचं चित्र उभे केलं तर लोकसभेला काय चित्र दिसलं आपल्याला माहितीये. खास करुन उत्तर प्रदेशमध्ये. बरोबर सहा महिन्यानंतर निवडणुका झाल्या. ज्या प्रकारचा व्होटींग पॅटर्नमध्ये चेंज दिसला तो मी कधी पाहिला नव्हता. अशा काही घटना घडल्या नव्हत्या. मग हे कशामुळं झालं? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या झाल्या त्या निवडणुकांमध्ये ज्या प्रकारे पैशाचा वारेमाप वापर होतोय. त्याला मर्यादाच नाही," असं राज ठाकरे म्हणाले.

उद्या जेव्हा सत्ता बदलेल...

"70 लोक बिनविरोध निवडून येत आहे. पाण्यासारखा पैसा. कुठून येतोय हेच समजेनासं झालं. पनवलेमध्ये एका मताला 15 हजार देत असल्याचं समजलं. ही कुठली निवडणूक सुरु आहे. ईव्हीएम, मतदारयादीच्या प्रश्नात तर मी जातच नाही. या निवडणुका नाही सुरु आहेत. भाजपा, शिंदे, अजित पवार या गोष्टी करत आहेत आज तर सत्तेचा अमरपट्टा कोणाकडे नाही. उद्या जेव्हा सत्ता बदलेल, समोरचे जेव्हा दामदुपटीने करतील त्यावर तुम्ही काय कराल?" असा सवाल राज ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना विचारला.

काँग्रेसनेही अनेकदा निवडणुका लढवल्या पण...

"दिशा दाखवणाऱ्या महाराष्ट्रात काय पायंडे पाडत आहोत त्याचे भविष्यात काय परिणाम होणार त्याचा काय परिणाम होणार याचा काहीच विचार ते करत नाहीत. यांनी 70 ठिकाणी मतदारांना मतदानापासूनच बाजूला ठेवलं. नोटा बटणही त्यांनी दाबायचं नाही? म्हणजे पोलीस यंत्रणा, प्रशासन, निवडणूक आयोग, पैसे यांच्या बाजूला. ही कोणती निवडणूक आहे? काँग्रेसनेही अनेकदा निवडणुका लढवल्या पण हे असं सगळं कुठे झालं नाही," असं राज ठाकरे म्हणाले. 

तुम्ही कोणता मतदार तयार करत आहात?

"विरोधकांचं काम आम्ही करतोच. ज्या प्रकारे अनेक लोक मी मतदानच नाही करणार असं म्हणतात हे चालणार नाही ना. लोकांनी मतदानासाठी बाहेर पडून राग व्यक्त केला पाहिजे. त्यांनी या लोकांना सांगितलं पाहिजे की अशाप्रकारचा महाराष्ट्र तुम्ही नाही उभा करु शकत. जेव्हा जनक्षोभ मतदारपेटीत उतरले. भाजपाच्या मतदारांना आवडतंय का हे? मतपेटीबद्दलही शंकाच आहे ना. साधी गोष्ट लक्षात घेऊयात मुंबईत 10 लाख खोटे मतदार असल्याचं सांगताय मग तुम्ही कुठल्या मतदार याद्या तयार करत आहात? खरा मतदार असेल त्याच्या नावावर मतदान करत असाल तर तुम्ही कोणता मतदार तयार करत आहात?" असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. 

खोट्या मतदानावर या गोष्टी...

"आमच्या लढाईदरम्यान ज्या प्रकारचं वातावरण उभं राहत आहे ते पाहता आम्हाला यश मिळेल याची मला खात्री आहे. ज्या प्रकारचा राग मतदारांच्या मनात आहे तो पाहता मला खात्री आहे यश मिळेल," असं राज ठाकरे म्हणाले. "बदलापूरची बातमी पाहिली काँग्रेसचे 15 लोक भाजपामध्ये घेतले. हे काय चालू आहे? जे उभे राहतात ते मतदारांचा अपमान करत आहेत. मतदारांना गृहित धरलं जातंय 100 टक्के गृहित धरलं जात आहे. खोट्या मतदानावर या गोष्टी केल्या जातात मग मूळ मतदारांना कोण विचारणार?" असा सवाल उपस्थित केला.

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More