विषय गंभीर तिथे सुनेत्रा खंबीर... चाकणकर, अरोराच नाही तर 'लेडी बॉस'चा तटकरे, पटेलांनाही धक्का

Explained Sunetra Pawar Decisions: अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाल्यानंतर 30 जानेवारी रोजी सुनेत्रा पवारांनी राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 2, 2026, 01:32 PM IST
विषय गंभीर तिथे सुनेत्रा खंबीर... चाकणकर, अरोराच नाही तर 'लेडी बॉस'चा तटकरे, पटेलांनाही धक्का
सुनेत्रा पवारांनी घेतलेले अनेक निर्णय चर्चेत (फाइल फोटो)

Explained Sunetra Pawar Decisions: उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षांतर्गत मोठे फेरबदल करत जय पवार यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान दिले. त्याचप्रमाणे सुनेत्रा पवारांचा अजून एक मोठा निर्णय ठरला तो म्हणजे, निवडणुकीची रणनीती आखणाऱ्या नरेश अरोरा यांचा 'पत्ता कट' करण्याचा! त्यांनी मंत्री नरहरी झिरवळ प्रकरणाची दखल घेत चौकशीचे संकेत दिले असून, अजित पवारांच्या विकासकामांचा वारसा पुढे चालवण्याची भूमिका घेतली आहे. अशोक खरात प्रकरणावरुन वादात सापडलेल्या रुपाली चाकणकरांकडून आधी राज्याच्या महिला आयोग अध्यक्षपदाचा आणि नंतर पक्षाच्या महिला अध्यक्षपदाचा राजीनामा घेण्यावर सुनेत्रा पवार ठाम होत्या आणि त्यांनी ते करुनही दाखवलं. मागील काही काळात सुनेत्रा पवारांनी घेतलेले निर्णय हे त्याच पक्षाच्या खऱ्या बॉस असल्याचं अधोरेखित करणारे आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

सुनेत्रा पवार यांचे महत्त्वाचे निर्णय व हालचाली:

पक्षांतर्गत फेरबदल  : जय पवार यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत महत्त्वाची जबाबदारी दिली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

रणनीतिकारांना डच्चू : आगामी निवडणुकांसाठी रणनीती आखणाऱ्या नरेश अरोरा यांच्या कंपनीशी असलेला करार रद्द करून त्यांना कार्यमुक्त केले आहे. 

कोणत्या खात्यांचा कारभार : पदभार स्वीकारल्यानंतर प्राथमिकता  अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर, त्यांनी अबकारी (Excise), क्रीडा, अल्पसंख्याक कल्याण आणि वक्फ विभागांचा कार्यभार स्वीकारला.

पालकमंत्री पद: सुनेत्रा पवारांची त्यांचे पती अजित पवारांप्रमाणेच पुणे आणि बीड जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रशासकीय सुधारणा :  प्रशासनात पारदर्शकता आणि जनहिताचे निर्णय घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकांचा सपाटा लावला आहे.

अजित पवार गटाला बळकटी : पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जागा राखण्यासाठी, त्यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे.

रुपाली चाकणकरांचा राजीनामा : खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेण्याचा अंतिम निर्णय सुनेत्रा पवारांचाचा होता.

तटकरे, पटेलांच्या पदांचा उल्लेख टाळला : सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी 16 फेब्रुवारी 2026 रोजी पत्रव्यवहार केल्यानंतर 10 मार्च रोजी सुनेत्रा पवारांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेलांनी पाठवलेले पत्र ग्राह्य धरू नका म्हणून सांगितलं होतं. या घडामोडीनंतर पक्षात बरेच वादंग झाले. या वादानंतर निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात सुनेत्रा पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदाचा उल्लेखच केलेला नाही.

सुनेत्रा पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला 26 फेब्रुवारीला पाठवलेलं पत्र समोर आलं आहे. या पत्रात सुनेत्रा पवारांकडून फक्त स्वतःच्या पदाचा उल्लेख करण्यात आला आहे.  सुनेत्रा पवार यांच्याशिवाय फक्त शिवाजीराव गरजे यांचा खजिनदार म्हणून उल्लेख आहे.

26 फेब्रुवारी 2026 रोजी जेव्हा सुनेत्रा पवारांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड झाली त्याचवेळी हे ठराव पारित करण्यात आले होते.  विशेष म्हणजे 10 मार्च रोजी हे ठराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाला कळवले आणि त्याचवेळी हे देखील नमूद केले की 28 जानेवारी नंतरचा कोणताही पत्रव्यवहार अधिकृत म्हणून गृहीत धरला जाऊ नये. 26 फेब्रुवारी रोजी झालेल्या पक्षाच्या बैठकीतील निर्णय आणि पदाधिकारी यादी आम्ही आत्ता निवडणूक आयोगाला सादर करत आहोत. सुनेत्रा पवारांकडून फक्त 14 पदाधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे.

सुनेत्रा पवारांकडे नेतृत्व सोपवण्याची प्रमुख कारणे आणि पार्श्वभूमी:

अजित पवारांचा राजकीय वारसा: अजित पवारांच्या निधनानंतर पक्षात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी आणि पक्षातील कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्यासाठी सुनेत्रा पवारांना पुढे आणण्यात आले.

पक्षातील अंतर्गत स्थिरता: पक्षात फूट पडू नये आणि अजित पवारांच्या जवळच्या नेत्यांना (प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे इ.) लगाम घालण्यासाठी, तसेच पक्षात पोंढरपुर (पाटील-पवार) गट वाचवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला गेला.

घाईघाईत घेतलेला निर्णय: ही नियुक्ती अत्यंत घाईघाईत करण्यात आली, कारण अजित पवारांच्या निधनानंतर विरोधी गट (शरद पवार गट) सक्रिय होऊ शकतो, अशी भीती होती.

राजकीय वारसदार: अनेक कार्यकर्त्यांनी सुनेत्रा पवार या अजित पवारांच्या राजकीय वारसदार असाव्यात, अशी मागणी केली होती.

प्रशासकीय गरज: महायुती सरकारला अस्थिरतेपासून वाचवण्यासाठी आणि सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला

About the Author

Swapnil Ghangale

स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.

...Read More