Western Maharashtra Politics: पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी भारतीय जनता पार्टीमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये गेलेल्या बड्या नेत्याने पुन्हा स्वपक्षात प्रवेश केला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. मात्र ज्या नेत्याने अवघ्या दीड वर्षांमध्ये शरद पवारांची साथ सोडून पुन्हा आपल्या पक्षाचा मार्ग स्वीकारला त्या नेत्याची संपत्ती आणि शिक्षण किती आहे हे पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. हा नेता कोण? त्याची एकूण संपत्ती किती? त्यांचं शिक्षण किती झालं आहे जाणून घेऊयात अगदी सविस्तरपणे...
ज्या नेत्याबद्दल आपण मागील एवढ्या वेळापासून बोलत आहोत त्यांचं नाव आहे, समरजितसिंह घाटगे! भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा पूर्ण केल्यानंतर मागील बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित पक्षप्रवेश आज पार पडला. नगरपालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडून येत पक्षाशी नाळ जोडलेलीच ठेवली होती. यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा करून अधिवेशनानंतर अधिकृत प्रवेशाबाबत प्राथमिक सहमती झाली होती. आज हा प्रवेश सोहळा पार पडला. "माझ्या मूळ पक्षात परत येत असल्याचा मला अभिमान आणि समाधान आहे,” असे घाटगे म्हणालेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलताना घाटगे यांनी, “देवेंद्र फडणवीस हे माझ्या थोरल्या भावासारखे आहेत. त्यांनी नेहमीच मला मार्गदर्शन केले आहे. पक्षाबाहेर असतानाही मी अनेकदा त्यांच्या नावाचा उल्लेख केला. आता त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची पुन्हा संधी मिळत असल्याचा आनंद आहे अशी भावना व्यक्त केली.
"एक काळानंतर पुन्हा मुख्य प्रवाह व पक्षात येण्याची संधी मिळाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे माझ्यासाठी थोरल्या भावासारखे आहेत. गेल्यावेळी जी प्रक्रिया झाली, भाजपच्या एबी फॉर्मवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही जिंकलो. त्यामुळे हा प्रवेश एक औपचारिकता होती. सर्वांचे मी आभार मानतो. कार्यकर्त्यांना सांगतो, तुमचे ऐकून सगळे प्रयोग झाले. आता पक्ष सांगेल तशीच वाटचाल ठेवायची. धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात काम करायचे आहे. मी जिल्ह्याध्यक्ष असताना आमची राम-लक्ष्मण जोडी होती. आताही ती राहील," असा विश्वास समरजितसिंह घाटगेंनी व्यक्त केला.
दरम्यान, पालिका निवडणुकांनंतर डिसेंबर महिन्यात आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेवून, “मी पुढील राजकीय भूमिका काय असणार आहे, हे त्यांना स्पष्टपणे सांगितले होते. त्यांना विश्वासात घेऊनच पुढची पावले उचलली आहेत,” असेही घाटगे यांनी स्पष्ट केले.
समरजित घाटगे हे कोल्हापूरच्या शाहू छत्रपतींच्या जनक घराण्याचे (कागलचे घाटगे घराणे) वंशज असून ते 'श्री छत्रपती शाहू दूध आणि ॲग्रो प्रोड्युसर' कंपनीचे अध्यक्ष देखील आहेत. समरजितसिंह घाटगे हे उच्चशिक्षित असून ते चार्टर्ड अकाउंटंट आहेत. पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स येथून समरजितसिंह घाटगेंनी 2003 मध्ये वाणिज्य शाखेची पदवी पूर्ण केली. त्यानंतर पाच वर्षांनी म्हणजेच 2008 साली नवी दिल्ली येथून 'चार्टर्ड अकाउंटंट'चे शिक्षण पूर्ण केले.
ऑक्टोबर 2024 मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेल्या शपथपत्रानुसार, समरजित घाटगेंनी त्यांची एकूण संपत्ती सुमारे 160 कोटी रुपये इतकी असल्याचं जाहीर केलं होतं. यामध्ये त्यांच्याकडे असलेल्या वडिलोपार्जित शेतजमिनीचे मूल्य सर्वाधिक म्हणजेच 115 कोटी रुपयांहून अधिक आहे. त्यांची पत्नी नवोदिता घाटगे यांच्याकडे सुमारे 9 कोटी 6 लाख 41 हजार रुपये इतकी संपत्ती आहे. त्यांच्या नावावर सुमारे 14.58 लाख रुपये, तर त्यांच्या पत्नीच्या नावावर 32.18 लाख रुपयांचं कर्ज असल्याचे शपथपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. या शिवाय या शपथपत्रामध्ये घरं, जमिनींसंदर्भातील सविस्तर तपशील देण्यात आला आहे.
स्वप्निल घंगाळे हे मागील 12 वर्षांहून अधिक काळापासून डिजिटल पत्रकारितेमध्ये सक्रीय आहेत. 'महाराष्ट्र टाइम्स', 'लोकसत्ता' यासारख्या नामांकित कंपन्यांमध्ये त्यांनी यापूर्वी काम केलेलं आहे. राजकीय बातम्यांबरोबरच ताज्या घडामोडी, ट्रेण्डींग/ व्हायरल, टेक्नोलॉजी, क्रीडा, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातील बातम्यांमध्ये हातखंडा आहे. अवांतर वाचनाबरोबरच बातम्यांव्यतिरिक्त सोशल मीडियावर लिहायची आवड आहे. फावल्या वेळात चित्रपट पाहणे, भटकंती करायला आवडतं. बातमी अचूक असावी असा त्यांचा कटाक्षाने प्रयत्न असतो. सध्या ते 'झी 24 तास'मध्ये 'डेप्युटी न्यूज एडिटर' म्हणून कार्यरत आहेत.
...Read More|
RR
(11 ov) 150/3
|
VS |
MI
123/9(11 ov)
|
| Rajasthan Royals beat Mumbai Indians by 27 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 250/3
|
VS |
CSK
207(19.4 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Chennai Super Kings by 43 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.