Ajit Pawar Plane Crash : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान अपघातात निधन झाले. अजित पवार यांचे विमान क्रॅश होवून मोठी दुर्घटना घडली. अजित पवार यांच्या या विमान अपघाताबाबत अनेक शंका उपस्थित केल्या आहेत. अनेकांनी घातपाताचा देखील संशय व्यक्त केला आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताची CID सह विशेष पथकांमार्फत चौकशी सुरु आहे. अशातच मुंबई सायबर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अजित पवारांच्या निधनावर आक्षेपार्ह बातमी करणाऱ्या प्रसिद्ध युट्युबरला अटक केली आहे.
अजित पवारांच्या निधनानंतर अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडिओंमध्ये अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेचे व्हिडिओ दाखवून आक्षेपार्ह दावे केले जात आहेत. या व्हिडिओंमुळे दिशाभूल होत आहे. अशा व्हिडिओंची सायबर पोलिसांंमार्फत चौकशी सुरु असून कारवाई केली जात आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या निधनावर आक्षेपार्ह बातमी करणाऱ्या एका युट्युबरला मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी या युट्युबरला अटक करत त्याला मुंबई न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उध्दव कापसे असं पोलिसांनी अटक केलेल्या युट्यूबरचं नाव आहे. कापसे हा जालन्यातील बदनापूर तालुक्यातील बुटेगावचा रहिवासी आहे. कापसे हा युके न्यूज टाईम्स नावाचं युट्युब चॅनल चालवतो.
अजित पवारांच्या निधनानंतर त्याने ब्लॅक बॉक्स वर आक्षेपार्ह बातमी केली होती. मुंबई सायबर पोलिसांनी या बातमीची चौकशी करत या युट्युबर कापसेला अटक केली.विमानाची नेव्हिगेशन सिस्टीम हँग करण्यासारखी तांत्रिक माहिती त्याला नेमकी कोठून मिळाली, याची सायबर पोलीस आता कसून चौकशी करत आहेत. "विनाकारण अफवा पसरवून समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही," असा इशारा पोलिसांनी दिला आहे. दरम्यान या प्रकरणी मुंबई सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
RR
(11 ov) 150/3
|
VS |
MI
123/9(11 ov)
|
| Rajasthan Royals beat Mumbai Indians by 27 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
RCB
(20 ov) 250/3
|
VS |
CSK
207(19.4 ov)
|
| Royal Challengers Bengaluru beat Chennai Super Kings by 43 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.