अतिवृष्टीग्रस्त भागातील शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांची फी माफ, झी 24 तासाच्या 'फक्त लढ म्हणा'ला मुख्यमंत्र्यांकडून बळ

मुख्यमंत्र्‍यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी मोठी घोषणा केली. त्यासोबत झी 24 तासाच्या 'लढ म्हणा'ला मुख्यमंत्र्यांकडून बळ देण्यात आलं आहे. 

नेहा चौधरी | Updated: Oct 7, 2025, 03:55 PM IST
अतिवृष्टीग्रस्त भागातील शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांची फी माफ, झी 24 तासाच्या 'फक्त लढ म्हणा'ला मुख्यमंत्र्यांकडून बळ

मराठवाडा आणि सोलापूरमधील नुकसानग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात गेलं आहे. या विद्यार्थ्यांना पुन्हा प्रकाशाची वाट दाखवण्यासाठी झी 24 तासने पुढाकार घेतला आहे. लढ म्हणा या मोहीमर्तंगत या भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्यात येत आहे. झी 24 तासच्या या मोहीमेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बळ दिलं आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने पॅकेज जाहीर केलं आहे. त्यासोबत या भागातील शाळा आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांची फी माफ करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या हा निर्णय म्हणजे झी 24 तासाच्या मोहीमेचं मोठं यश आहे. 

Add Zee News as a Preferred Source

मुख्यमंत्री म्हणाले की, कुठल्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण अतिवृष्टीमुळे बाधित होऊ नये, त्या विद्यार्थ्यांचे स्वप्न खंडीत होऊ नयेत, अशा प्रकारचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत आहे. दुष्काळावेळच्या सर्व उपाययोजना ओला दुष्काळ समजून केल्या जात आहेत. त्या जमीन महसुलात सूट, कर्जाचं पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाची वसुली, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी अशा सर्व गोष्टी लागू करण्यात येत आहे, असंही त्यांनी या पत्रकार परिषदेतून घोषणा करण्यात आली. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा केली आहे. दिवाळीपूर्वी बळीराजाच्या खात्यामध्ये मदतनिधी जमा होईल याची काळजी घेतली जाईल, असंही मुख्यमंत्री यावेळी सांगितलं. शेतकऱ्यांची जमीन अतिवृष्टीच्या पाण्यात वाहून गेली, त्यांना हेक्टरी 3.47 लाख रुपयांची मदत तर अतिवृष्टीग्रस्तांसाठी तब्बल 31 हजार 628 कोटी रुपयांचे मदतीचे आजच्या पत्रकार परिषदेतून राज्य सरकारने घोषित केली आहे. 

राज्य सरकारने अतिवृ्ष्टीग्रस्तांसाठी आज दहा मोठ्या घोषणा केल्या आहेत. राज्य सरकारने कोरडवाहू शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 18500  रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर हंगामी बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 27 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे. ही मदत अतिवृष्टीग्रस्त 29 जिल्हे, 253 तालुके आणि 2059 मंडळांचा समावेश असणार आहे. 

एवढंच नाही तर ज्या घरांचं संपूर्ण नुकसान झालेलं आहे, त्या घरांसाठी आता आपण नव्याने घरं बांधणार असल्याचेही त्यांनी यावेळी घोषणा केली. शेतकऱ्याला जोमाने पुन्हा उभी करणारच असा निर्धार राज्य सरकारने घेतली आहे.  

FAQ

1: अतिवृष्टीमुळे कोणत्या भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य बाधित झाले आणि त्यासाठी काय उपाययोजना?
उत्तर: मराठवाडा आणि सोलापूरमधील नुकसानग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात गेले आहे. झी २४ तासने 'लढ म्हणा' मोहिमेद्वारे या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून पुन्हा प्रकाशाची वाट दाखवली जात आहे. राज्य सरकारने शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांची फी माफ केली आहे.

2: झी २४ तासच्या मोहिमेला कोणत्या नेत्यांचे समर्थन मिळाले?
उत्तर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झी २४ तासच्या 'लढ म्हणा' मोहिमेला बळ दिले आहे. या मोहिमेचे मोठे यश म्हणजे राज्य मंत्रिमंडळाने विद्यार्थ्यांची फी माफ करण्याचा निर्णय घेतला.

3: मुख्यमंत्र्यांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी काय म्हटले?
उत्तर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण अतिवृष्टीमुळे बाधित होऊ नये, त्यांची स्वप्ने खंडित होऊ देणार नाही. दुष्काळावेळच्या उपाययोजना ओला दुष्काळ समजून केल्या जात आहेत, ज्यात जमीन महसूल सूट, कर्ज पुनर्गठन, शेती कर्ज वसुली थांबवणे आणि परीक्षा शुल्क माफी यांचा समावेश आहे.

4: अतिवृष्टी मदत पॅकेजची घोषणा कोणी केली?
उत्तर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा केली. दिवाळीपूर्वी बळीराजाच्या खात्यात मदत जमा होईल, अशी काळजी घेतली जाईल.

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More