Daund Crime News : पुण्यातील दौंड शहरा लगत असणाऱ्या बोरावके नगरमध्ये प्राईम टाऊनच्या पाठीमागे असणाऱ्या कचऱ्याच्या ढिगार्यात भ्रूण आणि मानवी शरीराचे काही अवशेष आढळून आल्याची माहिती मिळत समोर आली आहे. यामुळे तेथील परिसरात एकच खळबळ उडाली आहे. प्रथमदर्शनी ही भ्रूण आणि मानवी शरीराचे अवशेष हे प्रयोग शाळेतील नमुने असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, हा गर्भपाताचा प्रकार आहे का या दृष्टीने देखील दौंड पोलीस सध्या तपास करत आहेत.
दौंडमधील स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास ही बाब आल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या 112 क्रमांकाला फोन करून या संदर्भातील माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच दौंड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेची पाहणी करताच पोलिसांनी पाहणी अंती पंचनामा करून डॉक्टरांचे वैद्यकीय पथक देखील या ठिकाणी बोलावले आहे. हे भ्रूण आणि अवशेष ताब्यात घेण्यात आले असून हे या ठिकाणी कसे आले याचा शोध आता दौंड पोलीस करत आहेत. वैद्यकीय तज्ञांच्या अहवालानुसार यानंतर पोलीस पुढील कारवाई करणार आहेत.
कचऱ्याच्या ढिगाऱ्यात हे भ्रूण कसे आले?
दौंडमधील या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिसांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली आहे. त्यानंतर या ठिकाणी हे भ्रूण कसे आले की कोणी टाकले आहेत याचा देखील शोध पोलीस घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे भ्रूण आणि काही मानवी शरीराचे अवशेष सीलबंद बरण्यांमध्ये ठेवली असून त्यावरती त्या संदर्भातील माहिती देखील आहे आणि ते 2020 मधील आहेत अशी प्राथमिक माहिती आता समोर आली आहे. मात्र, या कचऱ्याच्या ढिकाऱ्यात हे भ्रूण आणि मानवी शरीराचे अवशेष कसे आले याचा शोध दौंड पोलीस घेत आहेत.
सोनेश्वर भगवान पाटील हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनिअर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 7 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 20 व्या वर्षी त्यांनी TV9 मराठी News चॅनलमधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी डिजिटल मीडियासह व्हिडिओ प्रोड्यूसर म्हणून अनेक वर्ष काम केलं आहे. यामध्ये मनोरंजन, राजकीय घडामोडी, स्पोर्ट्स, टेक, व्हायरल व्हिडिओ तसेच राशी भविष्यसह चाणक्य नीति अशा या सर्व क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलं आहे.
...Read More|
WI
(20 ov) 196/6
|
VS |
ENG
166(19 ov)
|
| West Indies beat England by 30 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
QAT
(20 ov) 215/5
|
VS |
BRN
164/7(20 ov)
|
| Qatar beat Bahrain by 51 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
AUS
(20 ov) 182/6
|
VS |
IRE
115(16.5 ov)
|
| Australia beat Ireland by 67 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.