Mumbai Crime News :  आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना 15 लाखांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी  मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरामुळे खळबळ उडाली आहे. मिरा भाईंदर पोलिस आयुक्तालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र शेलार आणि पोलिस हवालदार गणेश वनवे यांनी आरोपीकडे एका प्रकरणात 50 लाखांची मागणी केली होती. त्याची तडजोड 35 लाखात करण्यात आली होती. त्यानंतर बुधवारी मध्यरात्री 15 लाख रुपये घेताना हवालदार गणेश वनवे याला रंगेहाथ अटक करण्यात आली.


मिरारोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हवालदार गणेश वनवे याला अटक करण्यात आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र शेलार फरार झाले आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईने पोलिस आयुक्तालयात एकच खळबळ उडाली आहे.


94 किलो चांदी घेऊन दरोडेखोर फरार मुंबई आग्रा महामार्गावर मुंडेगाव जवळ रंगला थरार


मुंबई नाशिक आग्रा महामार्गावर तीन ते चार जणांनी सोन घेऊन जाणाऱ्या कुरिअर व्हॅन वर सशस्त्र दरोडा टाकला. व्हॅन थांबवून ड्रायव्हरच्या डोळ्यांमध्ये मिरची पूड टाकून लोखंडी रॉडने मारहाण करत हा दरोडा टाकल्याचा प्रकार समोर आला आहे. या दरोड्यात व्हॅन मध्ये असलेले जवळपास साडेतीन किलो सोन आणि 94 किलो चांदी चोरून जवळपास साडेतीन कोटी रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पसार झाले आहेत. नाशिक ग्रामीणचे वरिष्ठ अधिकारी आणि घोटी पोलीस स्थानकाचे अधिकारी या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. या घटनेची घोटी पोलीस स्टेशन येथे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.


16 वर्षीय तरुणाची हत्या


परभणी येथे सामाईक रस्त्याच्या कारणावरुन झालेल्या वादात एका 16 वर्षीय मुलाचा हत्या करण्यात आल्याची घटना 13 फेब्रुवारी 2022 रोजी रामेश्वर प्लॉट भागात घडली होती. परभणी मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती उज्वला नंदेश्वर यांच्या न्यायालयाने निकाल दिला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे मुख्य सरकारी अभियोक्ता ऍड. ज्ञानोबा दराडे यांनी काम पाहिले. कमल मिरासे यांनी 14 फेब्रुवारी 2022 रोजी नानलपेठ पोलिसात तक्रार दिली होती. रामेश्वर प्लॉट भागात राहतात याच ठिकाणी त्यांचे भाये देखील राहतात. सदर प्लॉट पैकी सर्वांना आपआपला हिस्सा मिळाला आहे. प्लॉटच्या मागील बाजुस राहत असलेले भाया आणि फिर्यादी यांच्यात सामाईक रस्ता सोडलेला आहे. या रस्त्यावरुन त्यांच्यात वाद होत होते. 13 फेब्रुवारी 2022 रोजी सामाईक रस्त्यावर दुचाकी उभी करण्यावरुन वाद झाला, वाद होऊन भांडण झाले होते यात फिर्यादीचा मुलगा दत्ता गणेश मिरासेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी नानलपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात ११ साक्षीदार तपासण्यात आले. सुनावणी अंती न्यायाधीश श्रीमती उज्वला नंदेश्वर यांनी आरोपी दीपेश उर्फ दीपक माणिकराव मिरासे, भीमराव उर्फ नितीन नंदकिशोर नेमाने या दोघांना जन्मठेप, १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास सहा महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.