Crime News : मुंबईमधील गोरेगाव येथून साईंची पालखी घेऊन जाणाऱ्या एका साई भक्तावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिर्डीजवळील सावळीविहीर येथे हा गोळीबार झाला असनू निलेश पवार साईभक्त बचावला आहे. पूर्ववैमनस्यातून (Animosity Firing in Shirdi) गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समजत आहे. जखमीवर शिर्डीतील साईबाबा हाॅस्पीटलमध्ये (Shirdi Sawali Vihir Firing)  उपचार सुरू असून गोळीबार करणाऱ्या आरोपी तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (Firing at Sai Palkhi in Mumbai near Shirdi Nilesh Pawar latest marathi crime news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय घडलं
निलेश पवार मुंबईतील (Mumbai) गोरेगावमधील (Goregaon) साई पालखीसोबत शिर्डीकडे निघाले होते. पालखी शिर्डीजवळ साळवीविहीर येथे आरोपी तरूणाने निलेशवर गोळीबार केला. सुदैवाने यामध्ये इतर कोणतीही जीवितहानी झाली नाही. निलेश यांच्या खांद्याला गोळी लागली असून यामध्ये आणखी एकजण जखमी झाला आहे. 


जखमी निलेश पवार आणि एकाला शिर्डीमधील साईबाबा हाॅस्पीटलमध्ये (Shirdi Saibaba Hospital) दाखल करण्याता आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. गोळीबार करणारा आरोही हा निलेश पवार याचा मेहुणा असल्याचं समजत आहे. दोन वर्षांआधी निलेशने आरोपीच्या बहिणीसोबत पळून जात लग्न केलं होतं. याचाच राग मनात धरत आरोपीने निलेशवर गोळीबार केल्याचं बोललं जात आहे.