बूट भिरकावलेल्या प्रकाराबद्दल 'टू द पॉईंट'मध्ये थेट बोलले निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई

झी २४ तासच्या 'टू द पॉईंट' या मुलाखतीत निवृत्त सरन्यायाक्षीश भूषण गवई यांनी बूट फेक प्रकरणावर आपली प्रतिक्रिया स्पष्ट केली आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Dec 13, 2025, 09:32 PM IST
बूट भिरकावलेल्या प्रकाराबद्दल 'टू द पॉईंट'मध्ये थेट बोलले निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई

झी २४ तासच्या टू द पॉईंट या मुलाखतीत निवृत्त सरन्यायाधीक्ष भूषण गवई यांनी अनेक ्प्रश्नांवर आपली थेट भूमिका मांडली. यावेळी त्यांनी बूट फेक प्रकरणावर देखील आपल मत मांडलं. झी २४ तासचे संपादक कमलेश सुतार यांनी त्यांना प्रश्न विचारला की, सर्वोच्च पदावर बसलेले असताना बूट फिरकावण्याचा प्रकार घडतो, याबाबत काय सांगाल? यावर भूषण गवई म्हणाले की, सुरुवातीला बूट कोणत्या कारणाने भिरकावला याबाबत मला कल्पना नव्हती. पण अशा लहान सहान गोष्टींकडे लक्ष न देता न्यायदानाचं कामाकडे लक्ष केंद्रित करावं. 

Add Zee News as a Preferred Source

बूट फिरकावल्या प्रकरणावर भूषण गवई यांनी दुर्लक्ष केलं आहे. बूट फेक विसरुन न्यायदानावर लक्ष केंद्रित केल्याच भूषण गवई यांनी टू द पॉईंटच्या मुलाखतीत सांगितलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणी दरम्यान राकेश किशोर यांनी बूट फेक केली होती. निवृत्त सरन्यायाधीक्ष भूषण गवई यांनी टू द पॉईंट मुलाखतीत याबाबत माहिती दिली आहे. 

ज्या राकेश किशोर यांनी निवृत्त सरन्यायाधीक्ष भूषण गवई यांच्यावर बूट फिरकावला त्यांना त्यांचा बूट परत करुन आपण या प्रकरणाकडे फार लक्ष देत नसल्याचं ते म्हणाले. सुरुवातीला कारण कळलं नाही पण मग मी नेमकं काय झालं हे विचारलं तेव्हा माझ्या एका निर्णाबद्दल नाराजी असल्याचं कळलं. 

काय आहे नेमकं प्रकरण?

 6 ऑक्टोबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या courtroom क्रमांक 1 मध्ये ही घटना घडली. राकेश किशोर नावाच्या 71 वर्षीय वकिलाने सुनावणी सुरू असताना सरन्यायाधीश गवई यांच्या दिशेने आपला बूट भिरकावण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी तातडीने हस्तक्षेप करून त्याला पकडले. बूट न्यायपीठापर्यंत पोहोचला नाही. हा प्रकार घडत असताना आरोपी वकिल "सनातन धर्म का अपमान नही सहेगा हिंदुस्तान" (हिंदुस्तान सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही) अशा घोषणा देत होता.

मध्य प्रदेशातील खजुराहो येथील भगवान विष्णूच्या मूर्तीच्या जीर्णोद्धारासाठी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सरन्यायाधीश गवई यांनी केलेल्या काही मौखिक टिप्पणीमुळे आपल्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा दावा आरोपी वकिलाने केला. गवई यांनी याचिकाकर्त्याला "देवाला जाऊन सांगा" असे म्हटले होते, ज्यावर वकिलाने आक्षेप घेतला. या घटनेनंतरही सरन्यायाधीश गवई विचलित झाले नाहीत आणि त्यांनी सुनावणी सुरूच ठेवली. "अशा गोष्टींचा माझ्यावर परिणाम होत नाही" असे ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीने वकिलावर अवमानाची (contempt) कारवाई न करण्याचा निर्णय घेतला, परंतु बार कौन्सिल ऑफ इंडियाने राकेश किशोरचे वकिलीचे प्रमाणपत्र रद्द केले.

 या घटनेनंतर काही दिवसांनी, राकेश किशोरवर दिल्लीच्या कडकडडूमा न्यायालयात काही लोकांनी चपलेने हल्ला केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. 

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More