... तर गुंड निलेश घायवळ परदेशात फरार झालाच नसता; 4 वर्षांपूर्वीची पुणे पोलिसांची ती एक चूक अन्...

Nilesh Ghaiwal: निलेश घायवळ चा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची पुणे पोलीस आयुक्तांची माहिती

मानसी क्षीरसागर | Updated: Oct 7, 2025, 10:04 AM IST
... तर गुंड निलेश घायवळ परदेशात फरार झालाच नसता; 4 वर्षांपूर्वीची पुणे पोलिसांची ती एक चूक अन्...
Gangster Nilesh Ghaywal passport raw Ghaywal got passport due to a mistake by Pune Police

चंद्रकांत फुंदे, झी मीडिया

Nilesh Ghaiwal: सध्या महाराष्ट्रात चर्चा आहे ती पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळची. कोथरुड कोथरुड गोळीबार घटनेनंतर पुणे पोलिसांनी घायवळ गँगच्या दहा सदस्यांवर 'मकोका'अंतर्गत कारवाई केली आहे. मात्र, या गॅंगचा मोऱ्हक्या निलेश घायवळ याला अटक करण्यापूर्वीच तो परदेशात फरार झाला आहे. आता घायवळचे अनेक कारनामे समोर आले आहेत. असं असतानाच घायवळकडे पुणे पोलिसांचे दुर्लक्ष नडले असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. 

Add Zee News as a Preferred Source

गुंड निलेश घायवळला परदेशातून आणण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. तसंच, त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे. तशी माहिती पुणे पोलिस आयुक्तांनी दिली आहे. दरम्यान 2021 रोजी पुणे पोलिसांनी जर ती एक चूक केली नसती तर कदाचित आज निलेश घायवळ परदेशात पळून गेला नसता. 

मिळालेल्या माहितीनुसार, खंडणी प्रकरणात 2021 मध्ये न्यायालयाने जामीन देताना निलेश घायवळला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र असं असतानाही त्याने पासपोर्ट जमा केला नव्हता. त्याचवेळी पुणे पोलिसांनी त्याच्याकडील पासपोर्टबाबत चौकशी केली असती तर घायवळ नावाचा आणि बेकायदेशीरपणे मिळवलेल्या पासपोर्टचा विषय समोर आला असता. तत्कालीन पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष नडले अशी चर्चा आता पोलीस दलात सुरू आहे.

निलेश घायवळविरोधात अखेर बनावट पासपोर्ट प्रकरणातही गुन्हा

कोथरूड गोळीबारानंतर घायवळ विरोधात सलग चौथा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरी माहिती लपवण्यासाठी बोगस पत्ता आणि बनावट आधार कार्ड धारण करून पासपोर्ट काढल्याचा घायवळविरोधात आरोप आहे. नगरचा बनावट पत्ता दाखवून घायवळने पासपोर्ट काढल्याचं समोर झाल्यानंतर घायवळ विरोधात नगर की पुण्यात गुन्हा दाखल होणार याबाबत चर्चा सुरू होती. अखेर पुणे पोलिसांनीच घायवळविरोधात फेक पासपोर्ट प्रकरणी केला गुन्हा दाखल केला आहे. 

पुणे पोलिसांना निलेश घायवळच्या घरात काय सापडलं?

पुणे पोलिसांनी निलेश घायवळच्या कोथरूडमधील घरात केलेल्या छापेमारीदरम्यान त्यांना बंदुकीच्या गोळ्या आढळून आल्या आहेत. याशिवाय, पोलिसांच्या हाती घायवळच्या विविध मालमत्तांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे लागली आहेत. यामध्ये सातबारे, साठेखत आणि विविध जमिनींची कागदपत्रे यांचा समावेश आहे. याबरोबरच, मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पासंदर्भातील काही महत्त्वाच्या फाइल्सदेखील पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

FAQ

प्रश्न १: निलेश घायवळ कोण आहे आणि सध्या तो कुठे आहे?

उत्तर: निलेश घायवळ हा पुण्यातील कुख्यात गुंड आहे. कोथरूडमधील गोळीबार घटनेनंतर पुणे पोलिसांनी त्याच्या गँगच्या दहा सदस्यांवर 'मकोका' अंतर्गत कारवाई केली आहे. मात्र, अटक होण्यापूर्वीच तो परदेशात फरार झाला आहे. सध्या त्याला परदेशातून आणण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

प्रश्न २: निलेश घायवळच्या परदेश फरारीशी संबंधित पोलिसांची कारवाई काय आहे?

उत्तर: घायवळला परदेशातून आणण्यासाठी पुणे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच, त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची प्रक्रिया देखील सुरू केली आहे. पुणे पोलिस आयुक्तांनी याबाबत माहिती दिली आहे.

प्रश्न ३: २०२१ मध्ये घायवळच्या प्रकरणात पोलिसांचे दुर्लक्ष कसे झाले?

उत्तर: २०२१ मध्ये खंडणी प्रकरणात न्यायालयाने घायवळला जामीन देताना पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्याने पासपोर्ट जमा केला नव्हता. पुणे पोलिसांनी त्याच्याकडील पासपोर्टबाबत चौकशी केली असती तर बेकायदेशीर पासपोर्टचा विषय समोर आला असता. तत्कालीन पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष नडले अशी चर्चा पोलीस दलात सुरू आहे.

About the Author

Mansi kshirsagar

मानसी क्षीरसागर झी 24 डिजीटलमध्ये सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांन मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. महाराष्ट्रा टाइम डिजीटल या वृत्तसंस्थेपासून कारकिर्दीची सुरुवात केली. राजकीय, मनोरंजन आणि अर्थ (infrastructure) या विषयात विशेष रुची आहे. त्याचबरोबर, बातमीमागची बातमी म्हणजेच घडामोडींचा विश्लेषणात्मक कव्हरेज करण्याची विशेष आवड. इन्फ्रास्ट्रक्चर आणि गुन्हे या बातम्यांमध्ये हातखंडा.

...Read More