गिरगावकरांचं कबुतर जा.. जा... आम्ही गिरगावकर संघटनेची कबुतर खान्यांबाबत आक्रमक भूमिका

सोशल मीडियावर बॅनर पोस्ट करत आम्ही गिरगावकर संघटनेनं कबुतर गो बॅकचा नारा दिलाय. इतकच नाही तर कबुतरखाने सुरु केले तर तीव्र आंदोलनाचा इशाराही दिलाय.

पूजा पवार | Updated: Oct 12, 2025, 09:28 PM IST
गिरगावकरांचं कबुतर जा.. जा... आम्ही गिरगावकर संघटनेची कबुतर खान्यांबाबत आक्रमक भूमिका
(Photo Credit : Social Media)

सीमा आढे (प्रतिनिधी) मुंबई : मुंबईत कबुतरखान्यांचा वाद पुन्हा उफाळून आलाय. जैन धर्मसभेनंतर आता आम्ही गिरगावकर संघटनेनं कबुतर खान्यांबाबत आक्रमक भूमिका घेतलीये. सोशल मीडियावर बॅनर पोस्ट करत आम्ही गिरगावकर संघटनेनं कबुतर गो बॅकचा नारा दिलाय. इतकच नाही तर कबुतरखाने सुरु केले तर तीव्र आंदोलनाचा इशाराही दिलाय.

Add Zee News as a Preferred Source

मुंबईतील कबुतरखान्यांचा वाद काही संपण्याचं नाव घेत नाहीये. कबुतरखाने पुन्हा सुरु करण्यासाठी जैन समाजाकडून महासभा घेण्यात आली.  या महासभेत  जैन मुनींकडून शांतीदूत जनकल्याण पक्षाची घोषणाही करण्यात आली. या महासभेनंतर आता आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक झालीये. कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान, अशा आशयाचे पोस्टर्स सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झालेत. शांतीदूताच्या कबुतरांना आता त्यांच्या राज्यात जनकल्याणासाठी पाठवण्याची सुरवात प्रत्येक मराठी लोकांना करावीच लागेल असं या बॅनरवर लिहिण्यात आलंय. यापर्वीही आम्ही गिरगांवकर संघटनेनं कबुतर खान्यासंदर्भात भूमिका घेतली होती. मात्र जैन महासभेनंतर या विरोधाला आणखीनच धार आलीये.

आगामी निवडणुका लक्षात घेता कबुतरखान्याच्या याविषयाला राजकीय रंगही चढलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही आम्ही गिरगावकर संघटनेच्या मागणीला पाठिंबा दिलाय. कबुतरखाने असावेत असं संविधानात म्हटलंय का असा सवाल संजय राऊतांनी उपस्थीत केलाय. तसं असेल तर मरीन लाईन्सच्या लायन्स क्लबमध्ये कबुतर खाना सुरु करण्याचं आवाहन त्यांनी केलंय.. तर कबूतरांवर फार राजकारण करणं योग्य नाही. त्यामुळे यावर लवकरच मध्यम मार्ग काढू असं आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलंय.

कबुतरांपासून होणारा धोका लक्षात घेऊन यात जैन समाजातील डॉक्टरांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन सामाजीक कार्यकर्त्या अंजली दमानीयांनी केलंय.  नको त्या विषयाचं राजकारण होत असल्याची टीकाही त्यांनी केलीये. ऐन निवडणुकीच्या तोंडावर कबुतरखान्यांचा वाद पुन्हा उफाळू आलाय. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्ष याचा फायदा घेणार यात शांका नाही. आता सरकार या वादावर कसा तोडगा काढणार याकडे सा-यांचं लक्ष लागलंय.

FAQ : 

मुंबईतील कबुतरखान्यांचा वाद म्हणजे नेमका काय?
उत्तर: मुंबईत कबुतरांना धान्य देण्याच्या (कबुतरखान्यांच्या) ठिकाणांमुळे आरोग्य धोका, गोंधळ आणि प्रदूषण होत असल्याचा आरोप होतोय. हा वाद काही वर्षांपासून सुरू आहे, ज्यात स्थानिक संघटना आणि धार्मिक संस्था यांच्यात संघर्ष आहे. कबुतरखान्यांना बंद करण्याची मागणी होतेय, तर काही जैन समाजाकडून ते पुन्हा सुरू करण्याची विनंती आहे.

जैन समाजाची भूमिका काय?
उत्तर: जैन समाज कबुतरखान्यांना धार्मिक आणि जनकल्याणाचे साधन मानतो. महासभेत त्यांनी पक्षाची घोषणा केली आणि कबुतरांना 'शांतीदूत' म्हटले. मात्र, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी जैन समाजातील डॉक्टरांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले, कारण कबुतरांमुळे आरोग्य धोका (जसे की आजार पसरणे) होतो.

गिरगावकर संघटना काय म्हणते?
उत्तर: संघटनेने कबुतरखान्यांविरोधात 'कबुतर गो बॅक'चा नारा दिला आहे. त्यांच्या बॅनरनुसार, मराठी लोकांनी कबुतरांना त्यांच्या मूळ राज्यात (मारवाड, राजस्थान) पाठवावे, जेणेकरून जनकल्याण होईल. यापूर्वीही त्यांनी भूमिका घेतली होती, पण जैन महासभेनंतर हा विरोध तीव्र झाला.

About the Author