)
Pune Jain Boarding House Land : पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जागेवरून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोपांच्या फैरी होत असतानाच मोठी बातमी समोर आली आहे. गोखले कन्स्ट्रक्शनकडून पुणे जैन जमीन व्यवहार रद्द केला जाण्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. HND ट्रस्टला बिल्डर गोखलेंकडून तसा मेल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेनंतर गोखलेंनी हा निर्णय घेतल्याचं समजतंय. मुरलीधर मोहोळ आणि राजू शेट्टी यांच्यात यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मिळतेय.
राजू शेट्टी यांनी रात्री उशिरा प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. बिल्डर गोखले यांच्या मेलची प्रतच राजू शेट्टी यांनी पत्रकारांना दाखवली. सोबतच केवळ जमीन व्यवहार रद्द करत असल्याचा मेल करणं पुरेसं नाही. हा व्यवहार पूर्णपणे रद्द होईपर्यंत आपला लढा थांबणार नसल्याचा इशाराही राजू शेट्टींनी यावेळी दिला. विशेष म्हणजे वाढता दबाब पाहता पुणे जैन बोर्डिंग जमिनीचा व्यवहार रद्द होणार असल्याची बातमी झी 24 तासनं दाखवली होती. झी 24 तासच्या बातमीच्या विश्वासार्हतेवरही या निमित्तानं पुन्हा एकदा मोहोर उमटली.
शहराती मॉडेल कॉलनी येथील सेठ हिराचंद नेमचंद जैन दिगंबर बोर्डिंगच्या जैन मंदिरासह परिसरातील जागा आणि मंदिर गहाण ठेवून तब्बल 70 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्यानंतर मोठा वाद पेटला होता. दरम्यान जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरणी आचार्य गुप्तीनंद महाराजांनी इशारा दिला होता की, 1 नोव्हेंबरपूर्वी व्यवहार रद्द करा अन्यथा उपोषण करु.
- मॉडेल कॉलनीतील जैन मंदिर गहाण ठेवून 70 कोटींचा व्यवहार
- कर्नाटकातील बिरेश्वर क्रेडिट सोसायटी आणि बुलढाणा बँकेचा कर्ज व्यवहार.
- अॅड. योगेश पांडे यांचा कायदेशीर आक्षेप.
- धर्मादाय आयुक्तांनी तातडीने सुनावणी, स्थगिती आदेश.
- जैन समाज आणि पुणेकरांनी विरोध आणि मोर्चा काढला.
- प्रकरणाची आगामी सुनावणी 28 ऑक्टोबर 2025 रोजी ठरलेली
- हा वाद धार्मिक, सामाजिक तसेच कायदेशीर दृष्टीने महत्त्वाचा असून पुण्यातील जैन समाजाचा आणि परिसराचा गूढ प्रश्न बनला आहे.