Amedia Company : अमेडिया कंपनीवर सरकार मेहरबान झालंय. कारण अमेडिया कंपनीला 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी सरकारकडून मुदतवाढ देण्यात दिलीय.. कोंढवा जमिनीचा व्यवहार रद्द करण्यासाठी अमेडिया कंपनीला 42 कोटी भरणं गरजेचं आहे. दरम्यान हेच 42 कोटी भरण्यासाठी कंपनीनं मुदतवाढ मागितली होती.
झी 24 तासनं पर्दाफाश केलेल्या मुंढवा जमीन प्रकरणाचा व्यवहार रद्द करण्यासाठी अमेडिया कंपनीला मुदतवाढ देण्यात आलीय.. झी 24 तासनं जमीन गैरव्यवहाराची बातमी ब्रेक केल्यानंतर काही तासातच या व्यवहारातून अमेडिया कंपनीनं माघार घेतली. तसंच व्यवहार रद्द करत असल्याचं देखील सांगितलं.. मात्र, मुद्रांक विभागाची फसवणूक केल्यामुळे 7 टक्के स्टॅम्प ड्युटीचे 21 कोटी आणि दंड मिळून एकूण 42 कोटी भरण्याची नोटीस मुद्रांक शुल्क विभागानं पाठवली होती. दरम्यान स्टॅम्प ड्युटीची हे पैसे भरण्यासाठी अमेडिया कंपनीनं मुदतवाढ मागितली होती. दरम्यान यानंतर सरकारनं कंपनीवर मेहरबानी दाखवत मुदतवाढही दिलीय.
अमेडिया कंपनीनं 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटींना खरेदी केली तसंच मुद्रांक शुल्क विभागाची फसवणूक करत केवळ 500 रूपयेच स्टॅम ड्युटी भरली. झी 24 तासनं हे सर्व प्रकरण महाराष्ट्रासमोर आणल्यानंतर सरकारकडून कारवाईला वेग आला आणि मुद्रांक शुल्क विभागानं जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी अमेडिया कंपनीला 7 टक्के स्टॅम्प ड्युटी भरण्याचे आदेश दिलेत.
झी 24 तासने उघडकीस आणलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अहवालही उद्या येणार आहे. दस्त नोंदणी पातळीवरील अनियमितता तपासण्यासाठी मुठे समिती गठीत करण्यात आली होती. ही समिती आज अहवाल सादर करणार आहे. या प्रकरणी रवींद्र तारु यांचं निलंबन करण्यात आलंय. मात्र विभागीय स्तरावर त्यांची चौकशी करण्यात आलीय.
मुंढवा जमीन प्रकरणात सरकार पुन्हा एकदा अमेडिया कंपनीवर मेहरबान झाल्याचं दिसतंय. कारण सरकारची फसवणूक केलेल्या या कंपनीला सरकारनं स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी मुदतवाढ दिलीय. तर दुसरीकडे चौकशी समितीचा अहवाल देखील उद्या समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अहवालातून नेमकं काय समोर येणार याकडे आता लक्ष लागलंय.
अमेडिया कंपनीला मुदतवाढ का दिली गेली?
अमेडिया कंपनीने 42 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरण्यासाठी मुदतवाढ मागितली होती.
मुंढवा जमीन प्रकरण काय आहे?
मुंढवा जमीन प्रकरणात अमेडिया कंपनीने 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटींना खरेदी केल्याचा आरोप आहे.
अमेडिया कंपनीवर काय आरोप आहेत?
अमेडिया कंपनीवर मुद्रांक शुल्क विभागाची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.
...Read More
LIVE|
WI
(37 ov) 98/6 (75 ov) 205
|
VS |
NZ
278/9(74.4 ov)
|
| Full Scorecard → | ||
|
SA
(20 ov) 213/4
|
VS |
IND
162(19.1 ov)
|
| South Africa beat India by 51 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
PHI
(20 ov) 182/5
|
VS |
INA
104(18.5 ov)
|
| Philippines beat Indonesia by 78 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
SIN
(20 ov) 156/8
|
VS |
THA
152/9(20 ov)
|
| Singapore beat Thailand by 4 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.