७ बलून बंधाऱ्यांच्या प्रकल्पाला हिरवा कंदील
जिल्ह्यातील बहुप्रतीक्षीत गिरणा नदीतील प्रवाही पाणी अडविण्याकरिता प्रस्तावित असलेल्या ७ बलून बंधाऱ्यांच्या प्रकल्प अहवालास अखेर राज्यपालांनी संमती दिलीय.
जळगाव : जिल्ह्यातील बहुप्रतीक्षीत गिरणा नदीतील प्रवाही पाणी अडविण्याकरिता प्रस्तावित असलेल्या ७ बलून बंधाऱ्यांच्या प्रकल्प अहवालास अखेर राज्यपालांनी संमती दिलीय.
'झी २४ तास'ने गिरणेचा पंचनामा मालिकेच्या माध्यमातून नुकताच या ७ बलून बंधाऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आणला होता. त्यांनंतर राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने या प्रकल्पांसाठी राज्यपालांची मंजुरी घेण्याचे सूचित केले होते. त्यानुसार जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह आमदार उन्मेश पाटील, आमदार डॉ. राहुल आहेर यांनी राज्यपालांची भेट घेतली.
या बंधाऱ्यांच्या प्रकल्पास मंजुरीची विनंती मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून राज्यपालांकडे करण्यात आली होती. त्याला राज्यपालांनी संमती दिल्याने लवकरच या बंधाऱ्यांचे काम आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. गिरणा नदीतून दरवर्षी वाहून जाणारे ४ ते ५ टीएमसी पाणी अडविण्यासाठी सात ठिकाणी बलून बंधारे प्रस्तावित आहेत.