चंद्रपूर, गडचिरोली : जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोपडलंय. चंद्रपूर-गडचिरोलीत पाऊस पाचव्या दिवशी कायम आहे. दरम्यान, प्रवासी बस नाल्यात कोसळ्याने मोठा धोका निर्माण झाला होता. मात्र, मोठ्या शर्तीने प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आले. चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आणि शहर यांना पाणीपुरवठा करणारं इरई धरण ७० टक्के भरलंय. त्यामुळे पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न मिटेल अशी आशा आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गडचिरोली जिल्ह्यात दक्षिण भाग अतिवृष्टीनं प्रभावित झालाय. अहेरी आणि आरमोरी या तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. गुरवळात नाल्यात कार वाहून जाताना बचावली असून कारमधील दोघं सुखरूप बचावलेत. भामरागडचा संपर्क अजूनही तुटलेलाच आहे. तर चामोर्शी तालुक्यातील कन्नमवार जलाशय पूर्ण भरलाय. 


चंद्रपूर जिल्ह्यात सावली तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस झालाय. आसोलामेंढा हा तलाव १०० टक्के भरलाय. त्यामुळे तलाव ओवरफ्लो झाला आहे.  या तलावावर आंनद घेण्यासाठी चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतायत. 



विदर्भातील सर्वात मोठ्या तलावांच्या यादीमध्ये आसोला मेंढा तलावाचं अग्रेसर आहे. या तलावामध्ये गोसेखुर्द धरणाचं पाणी सोडल्यानं आणि परिसरात चांगला पाऊस झाल्यानं दोन दिवसांपासून ओव्हरफ्लोला सुरुवात झालीय.