)
IMD Weather Update : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होणार असून, हवामान विभागाकडून देशातील जवळपास 14 राज्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे, यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे.
भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा कमी दबाचा पट्टा निर्माण झाला आहे, एक पश्चिमेकडे आणि दुसरा पूर्वेकडे असे दोन कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत. या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये आता भारतीय हवामान विभागाकडून (IMD) अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे, महाराष्ट्रात देखील पुढील काही दिवस पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे.
कोणत्या राज्यात पाऊस पडणार?
स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे, ज्यामध्ये पच्छिम बंगाल, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगाना, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान महाराष्ट्रात आधीच पावसामुळे मोठं नुकसान झालं आहे, त्यातच आता पु्न्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, चिंता वाढली आहे, आज देखील नाशिकसह अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
FAQ
1. राज्यात पावसाबाबत काय शक्यता आहे?
राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होणार असून, महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज नाशिकसह अनेक जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.
2 कमी दाबाचा पट्टा काय आहे आणि त्याचा परिणाम काय?
भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा दोन कमी दाबाचे पट्टे निर्माण झाले आहेत – एक पश्चिमेकडे आणि दुसरा पूर्वेकडे. या पट्ट्यांमुळे देशातील अनेक राज्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
3 कोणत्या राज्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे?
हवामान विभागाने देशातील जवळपास १४ राज्यांना पावसाचा हाय अलर्ट देण्यात आला आहे, ज्यात महाराष्ट्राचा समावेश आहे. स्कायमेटनुसार, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, आंध्र प्रदेश, तेलंगाना, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.