पुण्यातील शाळांना 21 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश

पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतील सर्व शाळांना 21 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुट्टीचे आदेश जारी केले आहेत. 

वनिता कांबळे | Updated: Jan 20, 2026, 11:10 PM IST
 पुण्यातील शाळांना 21 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आदेश

Pune School Holiday: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पुण्यामध्ये प्रशासनाकडून शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 19 ते 23 जानेवारी दरम्यान  पुणे शहरात  आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा पुणे ग्रँड चॅलेंज टूर 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील कॉलेज आणि शाळांना 19 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. यानंतर आता या स्पर्धेसाठी पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतील सर्व शाळांना 21 जानेवारी रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश जारी केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

पुणे ग्रँड चॅलेंज टूर- 2026 आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या अनुषंगाने आयोजित दुसऱ्या टप्प्याच्या दिवशी पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड हद्दीतील सर्व प्रकारच्या सरकारी आणी खाजगी शाळांना बुधवारी 21 जानेवारी 2026 रोजी सुट्टी जाहीर करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.

पुण्यातील अनेक रस्ते हे वाहतुकीसाठी बंद राहणार 

येतोय 21 जानेवारी तसंच 23 जानेवारी रोजी पुण्यात सुरू असलेल्या ग्रँड सायकल टूर च्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अनेक रस्ते हे वाहतुकीसाठी बंद राहणार आहेत. बुधवारी पुण्यातील कॅम्प परिसरासह नांदेड सिटी भागातील काही रस्ते सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत बंद राहणार आहेत. तसेच 23 जानेवारी रोजी या सायकल स्पर्धेच्या अंतिम टप्प्याच्या निमित्ताने पुण्यातील मध्यवर्ती भागातील अनेक प्रमुख रस्ते ज्यामध्ये बालगंधर्व रंगमंदिर परिसराचा सुद्धा समावेश आहे. या ठिकाणी रस्ते सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत बंद राहतील अशी माहिती सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी आज दिली. ज्या रस्त्यावरून ही सायकल रेस जाणार आहे ते रस्ते अंदाजे 30 मिनिटानंतर पुन्हा नागरिकांसाठी खुले केले जातील. तसंच नागरिकांनी पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असं आवाहन सुद्धा पोलिसांकडून करण्यात आलं आहे. 

सायकल स्पर्धेमुळे पुणेकरांचे हाल

ग्रँड टूरमुळे पुणे शहरातील नागरिकांचे पुरते हाल होत आहेत. पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेमुळे जंगली महाराज रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड, तसंच संचेती हॉस्पिटल समोरील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळालं. ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा पुण्याला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देत असली, तरी नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. पाय नसलेल्या एका रुग्णाला सोनोग्राफीसाठी रुग्णालयात जाता आलं नाही, तर काही नागरिकांना स्वतःच्या घरी पोहोचणंही कठीण झालं. पुढील दोन दिवस ही स्पर्धा सुरू राहणार असल्याने नागरिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

 

About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More