Mumbai wine shop permission decision : वाईन शॉप, किरकोळ देशी मद्यविक्री दुकानांना परवानगी देण्याचा निर्णय महाराष्ट्रातील गृहनिर्माण संस्था घेणार आहेत. वाईन शॉप, किरकोळ देशी मद्यविक्री दुकानांसाठी यापुढे सोसायटीची 'ना हरकत' बंधनकारक असणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत ही माहिती दिली.
किरकोळ विदेशी मद्य विक्री आणि किरकोळ देशी मद्य विक्री दुकानांच्या बाबतीत स्थलांतरासाठी यापुढे नोंदणीकृत सोसायटीची 'ना हरकत' घेणे बंधनकारक राहील आणि या निर्णयाची राज्यात सर्वत्र अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली.
पिंपरी- चिंचवड येथील काळेवाडी-रहाटणी परिसरातील नियमबाह्य दारू दुकानांचे परवाने रद्द करण्याबाबत सदस्य शंकर जगताप यांनी प्रश्नोत्तराच्या तासात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. पिंपरी चिंचवड मधील बजाज देशी दारू दुकान आणि विक्रांत वाईन्स शॉप या दोन्ही दुकानांचा परवाना निलंबित करण्यात आला आहे. परंतु त्यातील एकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या पुढील आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल, असेही उपमुख्यमंत्री पवार यांनी स्पष्ट केले.
मुंबईत नॅशनल पार्क अर्थात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात काही वनअधिकाऱ्यांनी दारु पार्टी केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये संरक्षण चौकीसारख्या ठिकाणी वनअधिकारी मद्यपान करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. उद्यानाच्या संचालिका अनिता पाटील यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. हा व्हिडिओ कोणी रेकॉर्ड केला आणि तो कसा प्रसारित झाला, याचाही शोध घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिलेत..
डिसेंबर महिन्याचा पहिला महिना उलटून गेला आहे. त्यामुळे आता जगभरातील लोकांना नवीन वर्षाचे वेध लागले आहेत. भारतातही मोठ्या उत्साहात नवीन वर्षांचे स्वागत केले जाते. अनेक लोक मद्यपान आणि पार्ट्या करतात. या काळात काही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते. कारण अनेक हॉटेल्स पब आणि बार नियम मोडतात. यामुळे एखादी दुर्घचना घडण्याची शक्यता असते. यामुळे आता नववर्षाच्या स्वागत समारंभांच्या पार्श्वभूमीवर दिनांक 22 ते दिनांक 28 डिसेंबर 2025 दरम्यान मुंबई अग्निशमन दलाने ‘विशेष अग्निसुरक्षा मोहीम’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात सर्व हॉटेल्स्, रेस्टॉरंट, पब, बारची तपासणी केली जाणार आहे. आग प्रतिबंधक उपाययोजना नसल्यास कारवाई होणार आहे..
वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे. याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात. यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| New Zealand beat India by 7 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.