Maharashtra Board 10th SSC Result 2025 Official Website To Check Result : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने दहावीचा निकाल 13 मे रोजी जाहीर केला जाणार आहे. दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना त्यांचे गुण पाहता येणार आहेत. आतापासूनच विद्यार्थी आणि पालकांची धाकधूक वाढली आहे. दरम्यान निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वजण निकाल पाहण्यासाठी धावपळ करतात. पण सर्वातआधी निकाल कसा पाहायचा हे जाणून घेऊया.
दहावीचा निकाल तुम्हाला ऑनलाइन पाहायचा असेल तर तुम्हाला पुढील वेबसाइट्सवर जाऊन पाहता येणार आहे.
- mahahsscboard.in
-mahresult.nic.in
- msbshse.co.in
- mh-ssc.ac.in
- sscboardpune.in
सकाळी 11 वाजता शिक्षण मंडळाच्या पत्रकार परिषदेनंतर, दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. दहावीचा निकाल पाहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील. समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.
दहावी बोर्डाचा निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा.
दहावी निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख आणि आवश्यक माहिती भरा.
दहावीचा रिझल्ट तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
दहावीचा निकाल डिजीलॉकरवर पाहण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा. यासाठी सर्वप्रथम डिजीलॉकरच्या साईटला भेट द्या. त्यानंतर इनपुट फिल्डसह एक नवीन विंडो ओपन होईल. तिथे तुमचा मोबाईल नंबर भरून Continue बटणावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी पाठवला जाईल. ओटीपी टाकल्यानंतर व्हेरिफाय बटणावर क्लिक करा. युजरनेम आणि पासवर्ड वापरून डिजीलॉकर अॅपवर लॉगइन करा. प्रोफाइल पेजवर जा आणि आधार क्रमांक टाकून सिंक करा. पहिल्या ड्रॉपडाउनमध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ निवडा. पुढील ड्रॉप डाउनमध्ये मार्कशीट निवडा. पुढील स्क्रीनमध्ये महाराष्ट्र एसएससी अॅडमिट कार्ड/ महाराष्ट्र एचएससी अॅडमिड कार्डवर नमूद केल्याप्रमाणे उत्तीर्ण होण्याचे वर्ष आणि रोलनंबर यासारखे आवश्यक तपशील भरा. GET Document वर क्लिक केल्यानंतर महाराष्ट्र SSC डिजीटल मार्कशीट प्रमाणपत्र डाउनलोड होईल.