पुणे : शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी (Teacher Recruitment Scam) प्रशासकीय अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. पुणे पोलिसांच्या सायबर सेल विभागाने आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक केली आहे. शिक्षक भरती घोटाळ्यात एका प्रशासकीय अधिकाऱ्याचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे. (ias officer sushil khodvekar arrested by cyber department of Pune police in teacher recruitment scam)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खोडवेकर हे शिक्षण विभागात 2019 ते डिसेंबर 2020 या कालावधीत शिक्षण विभागात कार्यरत होते. खोडवेकर यांनी पैसे घेतले असल्याचं तपासांती समोर आलं. त्यानंतर खोडवेकर यांना अटक करण्यात आली. सायबर विभागाने खोडवेकर यांना ठाण्यातून अटक केली. खोडवेकर यांना थोड्याच वेळात शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर केलं जाणार आहे.



दरम्यान याआधी या प्रकरणी पोलिसांनी तुकाराम सुपे, अभिषेक सावरीकर आणि प्रितीश देशमुख यांना अटक करण्यात आली आहे.


शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांनी 2019-20 च्या परीक्षा निकालांमध्ये फेरफार केली आहे. जवळपास 7 हजार 880 अपात्र परीक्षार्थींचे मार्क वाढवून त्यांना पात्र ठरवलं, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली होती. 


खोडवेकर यांच्याबद्दल थोडक्यात (Who is Sushil Khodvekar)


खोडवकेर हे 2011 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. खोडवेकर हे सध्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या उपसचिव पदी कार्यरत आहेत.