)
10th- 12th Exam News : दहावी- बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. तुमच्या घरात दहावी किंवा बारावीचे विद्यार्थी असेल तर या परीक्षेबद्दल दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. पहिला निर्णय हा विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा तर दुसरी निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ शकतं. सर्व प्रथम आनंदाची बातमी आपण जाणून घेणार आहोत. दहावी - बारावी बोर्डाच्या परीक्षेत पहिला दिवशी हिंदी किंवा मराठीचा पेपर घेण्यात येतो. पण आता या नियमात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आाल आहे. माध्यमिक शिक्षण मंडळाने हिंदी भाषेच्या पेपरच्या ऐवजी सोप्पा विषयाचा पेपर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
खरं तर हिंदीचा पेपर विद्यार्थ्यांना मार्क वाढविण्यासाठी सोप्पा मानला गेला आहे. पण असंख्य विद्यार्थ्यांना हिंदी पेपरमुळे मानसिक दबाव येतो, हे समोर आला आहे. त्यामुळे परीक्षेची सुरुवात विद्यार्थ्यांची चिंतेत आणि मानसिक दबावाने होते. त्यामुळे बोर्डाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा मोठा निर्णय घेतला आहे.
पहिला पेपरच जर हिंदीसारखा मुख्य विषय असेल त्यात मानसिक दबाव आल्यास विद्यार्थ्यांच्या पुढील पेपरांवर त्याचा ताण दिसून येतो. गेल्या काही दिवसांमध्ये हिंदी या विषयात विद्यार्थ्यांचा नापास होण्याची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. त्यामुळे परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना तणाव येऊ नये आणि अख्खा परीक्षेदरम्यान वातावरण तणावमुक्त राहावे यासाठी महत्त्वपूर्ण नियम घेण्यात आला आहे. पण बोर्डाकडून पहिला सोप्पा पेपर कुठला असेल याबद्दल अद्याप काही स्पष्ट सांगण्यात आलेले नाही. तर या बदलामुळे विद्यार्थी पहिल्या दिवशी सोपा विषय घेऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देण्याचा निर्णय घेतला आहे.
तरदुसरीकडे दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षांसंदर्भात महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सीबीएसई विद्यार्थ्यांसाठी हा नियम जाणून घेणे महत्त्वाचे आहे, नाहीतर त्यांचं वर्ष वाया जाऊ शकतं. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सांगितलं की, विद्यार्थ्यांनी नियमितपणे शाळेत हजेरी लावून किमान 75 टक्के उपस्थिती राखणे अनिवार्य असणार आहे. तुमची शाळेतील हजेरी ही 75 टक्के खाली असेल तर तुम्ही परीक्षेसाठी पात्र ठरणार नाही, असं ‘सीबीएसई’ने स्पष्ट केले आहे.
या सूचनांनुसार दहावी आणि बारावी हे दोन वर्षांचे शैक्षणिक कार्यक्रम जाहीर करण्यात आलं आहे. म्हणजे, दहावीची परीक्षा द्यायची असल्यास विद्यार्थ्याने नववी आणि दहावी असे दोन्ही वर्ग शिकलेले असणे बंधनकारक राहणार आहे. त्याचप्रमाणे, बारावीची परीक्षा देण्यासाठी अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्षांचा अभ्यास पूर्ण करणे गरजेचे राहणार आहे. केवळ अंतिम वर्षी शिकून परीक्षा देता येणार नाही, असा इशारा मंडळाने विद्यार्थ्यांना दिला आहे.
1. दहावी-बारावी बोर्ड परीक्षेत हिंदी पेपरबाबत कोणता बदल करण्यात आला आहे?
माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) दहावी आणि बारावी परीक्षेच्या पहिल्या दिवशी हिंदी किंवा मराठी पेपर ऐवजी सोपा विषय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक दबाव कमी होईल आणि परीक्षेची सुरुवात आत्मविश्वासाने होईल.
2. हिंदी पेपर बदलण्यामागचे कारण काय आहे?
हिंदी पेपर विद्यार्थ्यांना मार्क वाढविण्यासाठी सोपा मानला जातो, पण अनेक विद्यार्थ्यांना त्यामुळे मानसिक तणाव आणि नापास होण्याची भीती वाटते. पहिल्या पेपरमुळे पुढील परीक्षांवर परिणाम होतो. त्यामुळे बोर्डाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा बदल केला आहे.
3. पहिल्या दिवशी कोणता सोपा पेपर ठेवला जाईल?
बोर्डाने पहिल्या दिवशी सोपा विषय ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, पण नेमका कोणता विषय असेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. हे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देण्यासाठी केले जात आहे.
4. दहावी-बारावी परीक्षांसाठी हजेरी नियम काय आहे?
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) दहावी आणि बारावी परीक्षांसाठी किमान 75% उपस्थिती अनिवार्य केली आहे. जर उपस्थिती 75% खाली असेल, तर विद्यार्थी परीक्षेसाठी अपात्र ठरेल आणि वर्ष वाया जाईल.